फेमस

Dilp Kumar Update : दिलीप कुमारांना भेटण्यासाठी शरद पवारांची रुग्णालयात धाव, पाहा फोटो

हॉस्पिटलमध्ये रुटीन चाचणी आणि तपासणीसाठी त्यांना दाखल करण्यात आले होते.

Dilp Kumar Update : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Veteran actor Dilip Kumar) यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. कोव्हिड पीडित हॉस्पिटलमध्ये रुटीन चाचणी आणि तपासणीसाठी त्यांना दाखल करण्यात आले होते.

यासंदर्भात माहिती मिळताच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (Senior NCP leader Sharad Pawar) यांनी हिंदुजा रुग्णालयात जाऊन दिलीप कुमार यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या बरोबर चर्चाही केली.

गेल्या महिन्यात दिलीप कुमार यांना तपासणीसाठी दोन दिवस रुग्णालयात दाखल केले होते, परंतु नंतर काही दिवस घरीच उपचार चालू होते. प्रार्थना केल्याबद्दल सायराने सर्व चाहत्यांचे आभार मानले.

कोरोनाच्या महामारीतही सायरा त्यांची पूर्ण काळजी घेते, त्यांना क्षणभरही एकटं सोडत नाही. दिलीप कुमार यांच्या तब्येतीची अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असते. दिलीप कुमार आता पूर्वीपेक्षा खूप कमकुवत झाले आहेत, त्यांची प्रतिकारशक्ती देखील खालावली आहे, चालण्या करतानाही त्यांना त्रास होतो. तरी मी नेहमीच त्यांना पाठीशी आहे, अशी माहिती सायरा देते.

दिलीप कुमार आणि सायरा बानो:

यांनान बॉलिवूडमधील एक आदर्श कपल म्हणून ओळखले जाते. सायरा बानो सावलीसारख्या दिलीप कुमार यांच्यासोबत आहेत. त्यांची सेवा करत आहे. आमचा एकमेकांवर खूप प्रेम आहे. ‘मैं उन्हे सच्चा प्यार करती हूं और वे मेरी जिंदगी है,’ असे सायरा बानो यावेळी यापूर्वी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

कुमार यांची बॉलिवूड लाईफ :

1944 मध्ये ज्वार भाटा या चित्रपटाद्वारे आपली कारकीर्दी सुरू केली, त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. कोहिनूर ,मुगले ए आजम, देवदास, नया दोड, राम- शाम या समावेश आहे. दिलीप कुमार यांनी शेवटी 1998 मध्ये एका चित्रपटात दिसले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments