खूप काही

Sangram Thopte : कार्यकर्त्यांनी फोडलं होतं काँग्रेसचं ऑफिस, आता काँग्रेसकडूनच मोठी ऑफर

Sangram Thopte : राज्यातील पावसाळी अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होणार आहे, मात्र अद्याप विधानसभा अध्यक्ष ठरला नसल्याने विरोधी पक्षाने आवाज उठवला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रलिहून याबाबत आठवण करून दिली आहे. त्यातच आता काँग्रेसनेही आपला उमेदवार घोषित केला आहे. (Maharashtra assembly Monsoon session)

नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर विधानसभा अध्यक्षपद पूर्णपणे रिक्त होते, त्यातच विरोधी पक्षाने हा मुद्दा उचलून धरल्याने आता त्याची चर्चा होत आहे. मात्र काँग्रेसने ज्या संग्राम थोपटेंचे नाव पुढे केले आहे, ते नेमके कोण आहेत, हेच आपण पाहाणार आहोत. (Who is Sangram Thopte, to be elected as Assembly Speaker Election announcement from Congress)

congress bhavan pune
atack on congress bhavan pune

पुण्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आहेत. थोपटे यांनी आतापर्यंत भोर मतदारसंघातून तीन वेळा आमदारकी निवडून आणली आहे. त्यामुळे त्यांच्या कामासह काँग्रेसमध्ये चांगली ओळखही आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना या नावाची चर्चाही चांगलीच रंगली होती, मंत्रिमंडळात जागा न मिळाल्याने, संग्राम थोपटेंच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनावर हल्ला केला होता. या हल्ल्यात काही कार्यकर्त्यांनी थेट दगडफेक करून निषेध व्यक्त केला होता. तेव्हापासून संग्रम थोपटे आपल्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या, मात्र त्या चर्चांना अधिकृत दिजोरा मिळाला नाही.

41 वर्षांचे संग्राम थोपटे हे चर्चेतील आमदार आहेत. 22 मार्च 2017 रोजी राज्यातील तत्कालीन अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या प्रतींचे विधानभवनाबाहेर दहन केल्याबद्दल थोपटे यांच्यासह 18 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, तेव्हापासून काँग्रेसचे फायर ब्रँड नेते म्हणून थोपटेंची ओळख निर्माण झाली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments