फेमस

Disha Patani Birthday : अभ्यास सोडून 500 रुपये घेऊन आली मुंबईला, आता आहे करोडोंची मालकीन

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणीचा आज 26 वा वाढदिवस आहे,पाहुया देशाची अनटोल्ड स्टोरी.

Disha Patani Birthday : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणीचा (Disha patani) आज 26 वा वाढदिवस आहे. हटके स्टाईलमुळे ती नेहमीच चर्चेत असते. दिशाने बॉलिवूडमध्ये (Bollywood) महेंद्रसिंह धोनीच्या बायोपिकमधून (M. S. dhoni) पदार्पण केलं होतं. सुशांत सिंह राजपूतसोबत तिने या सिनेमात धोनीच्या पहिल्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आणि चाहत्यांची मनं जिंकली. (Disha Patani Birthday Disha Patni’s previous story of the actress)

यापूर्वी तिने तेलगू सिनेमा (Telugu cinema)  लोफरमध्येही काम केलं. यानंतर तिचा ‘कुंग फू पांडा’ हा सिनेमाही चांगलाच गाजला होता.

दिशाने तिच्या करिअरविषयी एका मुलाखतीत सांगितलं होतं. ड्रीम करिअरसाठी शिक्षण अर्ध्यावरच सोडावं लागल्याचं ती म्हणाली होती. मुंबईला फक्त 500 रुपये घेऊन आली होती. एकटी राहून काम करत होते, पण कुटुंबीयांकडून कधीही मदत मागितली नाही, असं तिने सांगितलं होतं.

दिशा पाटणी एक चांगली डान्सरही आहे. रणबीर कपूर (Ranbir kapoor)  हा दिशाचा क्रश होता. रणबीरचे पोस्टर लागलेल्या रस्त्यांवरून ती शाळेला जात असे. या पोस्टरकडे पाहत स्कुटी चालवताना अनेकदा आपला अपघात झाल्याचंही तिने सांगितलं आहे.

अभिनेत्री होण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या दिशाने तिच्या प्रत्येक सिनेमात भूमिकेला न्याय दिला. यशाच्या शिखरावर चढताना अनेक अडचणी आल्याचंही दिशा सांगते. मुंबईत फक्त 500 रुपये घेऊन आलेल्या दिशाने आता स्वतःसाठी घरही घेतलं आहे. वांद्रेमध्ये तिने 2017 मध्ये घर घेऊन स्वतःलाच गिफ्ट दिलं, ज्याची किंमत 5 कोटी रुपये आहे. दिशा पटाणी आज एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुढे येत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments