Mumbai rain: मुंबईत पहिल्याच पावसात लोकल ठप्प, वाहतूक कोंडी तर अनेक भागात साचले पाणी..
मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे तर रस्त्यांवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा आहेत.

Mumbai rain: मुंबईला पहिल्याच पावसाने चांगले झोडपून काढले आहे. पहाटेपासून पाऊस पडत असल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे तर रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पहाटेपासून जोरदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढणे कठीण जात आहे.(In the first rains in Mumbai, local jams, traffic jams and water have accumulated in many areas.)
हवामान खात्याने मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढे चार दिवस पाऊस असाच चालू राहणार असून 300 मि. मी. हून जास्त पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबईमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस झाल्याने सायन, कुर्ला या भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे तेथील लोकल सेवा देखील बंद करण्यात अली आहे. त्याचबरोबर मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना देखील लोकल ठप्प झाल्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
पाणी साचल्याने मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यांवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
सायन, किंग सर्कल आणि हिंदमाता या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांना पाण्यातून वाट काढून जाणे अवघड झाले आहे.
जोरदार पावसाबरोबरच आता थोड्याच वेळात समुद्राला मोठी भरती येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पाऊस असाच सुरू राहिला तर अजून काही भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे.(Soon there will be a big tide in the sea)