फेमस

bollywod news : दिशा पटानी, टायगर श्रॉफ फिरत होते रस्त्यावर, दिसला मुंबई पोलिसांचा खाकी बाणा …

लॉकडाऊन संदर्भातले नियम मोडल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला.

bollywood news :

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff ) आणि अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani ) बऱ्याचदा एकत्र दिसून येतात. दिशा पटानी आणि जॉकी श्रॉफ यांनी अनेक चित्रपटांत एकत्र कामही केले आहे. दोघांचाही फॅन फॉलोइंग मोठा असून, हे दोघेही डिनर डेट्स, ड्राइव्ह आणि पार्टीमध्ये एकत्र असतात.

ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी मुंबईतील बँडस्टँड परिसरात दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ हे जिममधून परतत होते. दोघेही फिरण्यासाठी मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या बँडस्टँडवर पोहोचले. कारमधून फेरी मारत असताना मुंबई पोलिसांनी अचानक त्यांना आडवले .

टायगर श्रॉफ कारच्या मागच्या बाजूला तर दिशा पुढे बसली होती. सोबत च्यांचा ड्रायव्हरही होता. त्यानंतर पोलिसांनी दोघांचेही आधारकार्ड तपासले. लॉकडाऊन संदर्भातले नियम मोडल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. बांद्रा पोलीस स्टेशन येथे अभिनेत्री दिशा पाटणी, टायगर श्रॉफ आणि त्यांच्या चालकावर कलम 188, 34 IPC दि, 2 जून 2021 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments