आपलं शहर

Global tender: BMC चे ग्लोबल टेंडर अखेर रद्द, वाचा आता पुढचे पर्याय

मुंबई महानगरपालिका ही ग्लोबल टेंडर काढणारी पहिली महानगरपालिका होती. परंतु हे ग्लोबल टेंडर आता बीएमसीने रद्द केले आहे.

Global tender: बृहन्मुंबई महानगरपालिकेने 1 कोटी लसींचे ग्लोबल टेंडर बनवले होते. बीएमसी ही ग्लोबल टेंडर काढणारी पहिली महानगरपालिका होती. परंतु हे ग्लोबल टेंडर आता बीएमसीने रद्द केले आहे.

ग्लोबल टेंडरमध्ये 10 कंपन्या सहभागी
मुंबईकरांना मोफत लस देता यावी म्हणून बीएमसीने ग्लोबल टेंडर जारी केले होते. या टेंडरमध्ये भाग घेण्यासाठी 10 कंपन्या पुढे आल्या होत्या. बीएमसीने या कंपन्यांना काही नियम व अटी लागू केल्या होत्या. परंतु हे नियम कंपन्या पूर्ण करू शकत नव्हत्या.(10 companies participated in the global tender)

ग्लोबल टेंडर रद्द करण्यामागचे कारण
मुंबईतील लसींच्या कमतरतेमुळे लसीकरणाचा वेग मंदावला होता. त्यामुळे महानगरपालिकेने ग्लोबल टेंडरच्या मार्फत एक करोड लसींची मागणी केली होती. या ग्लोबल टेंडरसाठी 10 कंपन्यांनी भाग घेतला होता. ज्यामधील एका कंपनीने आधीच नाव मागे घेतले. परंतु उरलेल्या कंपन्या नियम अटी पूर्ण करण्यास समर्थ नव्हत्या.

त्यानंतर या टेंडरमध्ये लस निर्माण करणाऱ्या एकही कंपनीने भाग घेतला नाही आणि दिलेले नियम आणि अटींना पूर्ण करेल अशी एकही कंपनी बीएमसीला मिळाली नाही त्यामुळे हे टेंडर बंद करावे लागेल.(Reason for cancellation of global tender)

केंद्र सरकारशिवाय आता कोणताही पर्याय नाही
या टेंडरमध्ये फायझर एक्सट्राजेनेका या कंपनीने देखील भाग घेतला होता. परंतु काही दिवसातच या कंपनीने माघार घेतली. आता टेंडर रद्द केले गेल्यामुळे महानगरपालिकेला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या लसी शिवाय कोणताही पर्याय नाही. त्यामुळे बीएमसीला आता केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या लसींवरच अवलंबून रहावे लागणार आहे.(BMC now has no option but to go for vaccines with the central government)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments