आपलं शहर

Global tender : 1 कोटी लसींच्या ग्लोबल टेंडरसाठी बीएमसीने बनवले नियम..

ज्या कंपन्या टेंडरमध्ये सामील झाल्या होत्या त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्र नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे ग्लोबल टेंडर यशस्वी होणार का?

Global tender: मुंबईतील लसींच्या कमतरतेमुळे बीएमसीने(BMC) ग्लोबल टेंडर (Global tender) काढले होते. मुंबई महानगरपालिका ही ग्लोबल टेंडर काढणारी पहिली महानगरपालिका ठरली. पण आता हे ग्लोबल टेंडर यशस्वी होणार की नाही? हा प्रश्न आहे.

मुंबईमध्ये एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यातच केंद्र सरकारकडे पुरेशा लसींचा साठा देखील नव्हता. त्यामुळे महानगरपालिकेने 12 मे रोजी हे ग्लोबल टेंडर काढले. 1 कोटी लसींचा पुरवठा या उद्देशाने ग्लोबल टेंडर काढण्यात आले होते.

टेंडरची अंतिम तारीख 18 मे होती परंतु मुदतवाढ करून ही तारीख 25 मे करण्यात आली. ज्या कंपन्या टेंडरमध्ये सामील झाल्या होत्या त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्र नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे ग्लोबल टेंडर यशस्वी होणार का?

पुरवठादारांकडून आवश्यक कागदपत्रांची मागणी
ग्लोबल टेंडरसाठी 9 पुरवठेदार समोर आले आहेत. त्या पुरवठादारांपैकी 7 पुरवठादारांनी लसींचा पुरवठा करण्यात रस दाखवला आहे. त्यामुळे या पुरवठादारांकडून पुढील तीन दिवसांमध्ये आवश्यक अशी सर्व कागदपत्रे घेऊन तपासली जातील.(Requirement of required documents from vaccine suppliers)

केंद्र सरकारकडून खाजगी रुग्णालयाला केला जातो लसींचा पुरवठा
किशोरी पेडणेकर यांनी आज सांगितले की, केंद्र सरकारकडून खाजगी रुग्णालयांना लसींचा पुरवठा केला जातो पण पालिकेला लस मिळत नाही. आम्ही देखील केंद्राकडून लस विकत घेऊन नागरिकांना मोफत लसीकरण करण्यास तयार आहोत.(Vaccines are supplied by the central government to private hospitals-kishori pednekar)

प्रविन दरेकर यांनी केली टीका
ग्लोबल टेंडरचा बार फुसका ठरला! असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, दीड महिन्यांपूर्वी परवानगी देऊनही राज्य सरकार व महानगरपालिका लस खरेदी करू शकली नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारने नियोजन न करता मोफत लसीकरण करण्याची घोषणा केल्यामुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा फज्जा उडाला.(Criticism by Pravin Darekar)

महानगरपालिकेने या टेंडरसाठी बनवलेले नियम

टेंडर भरणाऱ्या covid-19 लसींच्या पुरवठादारांनी डीसीजीआय आणि आयसीएनआरचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

लसींची ऑर्डर दिल्यानंतर पुरवठादारांनी तीन आठवड्यात या लसींचा पुरवठा करायला हवा.

लसींसाठी कोणतीही एडव्हान्स रक्कम दिली जाणार नाही.

टेंडर भरणाऱ्या कंपनीने सर्व खर्च आणि टॅक्स एकत्र करून रक्कम नमूद करावी.

60%पेक्षा अधिक लाईफ असणारी लस स्वीकारली जाणार नाही.

पहिली कंपनी मुदतीनुसार लस पुरवठा करू शकला नाही, तर दुसऱ्या कंपनीचा विचार केला जाऊ शकतो.

लसींचा दर्जा खराब आढळल्यास कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकून योग्य ती कारवाई केली जाईल.

लसींचा पुरवठा दिलेल्या वेळेत झाला नाही तर प्रतिदिन 1% प्रमाणे असेल ती रक्कम दंड म्हणून वसूल केली जाईल.(Rules made by BMC for this tender)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments