Mental Health: आहारात या 3 गोष्टी समाविष्ट केल्याने दूर होतो ताण-तणाव…
आजकाल मानसिक रुग्णांची संख्या जास्त वाढत आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये चिंता, भीती व तणावाचे वातावरण आहे.

Mental Health: कोरोना विषाणूमुळे (Corona virus) लोकांना बर्याच मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या कोरोना विषाणूच्या साथीनेमुळे अनेकजणांनी आपले खूप जवळचे नातेवाईक तर कांहिनी आपले जिवलग मित्र गमावले आहेत. तर किती लोकांना या साथीच्या आजाराचा त्रास सहन करावा लागला हे माहित नाही. लोक स्वत: आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी खूप काळजी घेत आहेत. भीती आणि तणावाच्या या वातावरणामध्ये लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रास जास्त होत आहेत.(Mental Health)
केळी :
केळी हे आपल्या आरोग्यासाठी(Health) खूप उपयुक्त आहे. केळी खाल्याने शरीरात हॅपी हार्मोन्स सक्रिय होतात. जर तुम्हाला कोणत्याही विषयाची सारखी चिंता वाटत असेल तर मग केळी खायला ताबडतोब सुरवात करा. जेणेकरून त्या वेळी बरे वाटेल. केळी खाल्ल्याने शरीराला योग्य ती साखर पुरविली जाते आणि तुम्ही आनंदी(Happy) राहता. आपल्यास जर आवडत असेल तर आपण केळी शेक देखील पिऊ शकता.(Banana)
केशर :
केशर चा उपयोग चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी वापरला जातो. केशरदेखील मेंदूत आनंदी हार्मोन्स(Hormones) सक्रिय करतात. चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी केशर खूप फायदेशीर आहे. कपड्यात लपेटून आपण त्याचा वास घेऊ शकतो किंवा त्याला अन्नामध्ये टाकून खाऊ शकतो.(Keshar)
अश्वगंधा :
अश्वगधा आपल्या देशात बर्याच वर्षांपासून आयुर्वेदिक ((Ayurvedic)औषधांमध्ये वापरल्या जात आहेत. तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये अश्वगंधा सहज मिळतील. याच्या गोळ्याही बाजारात अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. दररोज आपण १ ग्रॅम अश्वगंधा खाल्ल्या तर ताणतणावातून खूप मोठा आराम मिळतो.अश्वगंधा आपण दुधासोबत(Milk) देखील खाऊ शकतो.