एकदम जुनं

History of Mumbai: मुंबईचा इतिहास, ताजमहलपेक्षाही सर्वात जुनी इमारत आपल्याकडे आहे…

History of Mumbai: मुंबईमध्ये एक अशी वास्तू आहे जी ताजमहाल पेक्षाही खूप जुनी आहे, विशेष म्हणजे याचं अस्तित्व बहुसंख्य मुंबईकरांना आजही माहिती नाही.

 

History of Mumbai: मुंबईमध्ये एक अशी वास्तू आहे जी ताजमहाल पेक्षाही खूप जुनी आहे, विशेष म्हणजे याचं अस्तित्व बहुसंख्य मुंबईकरांना आजही माहिती नाही. ही वास्तू म्हणजे मुंबईचे मूळ स्थान. मुंबईमधील ऍसटेटिक हॉलच्या पाठीमागे एक जुनी इमारत आहे, ती इमारत एकूण पाचशे वर्षांपूर्वीची असल्यामुळे मुंबईचे तेच मूळ स्थान मानेले आहे.

कान्हेरीची गुंहा, पान गंगेची तळी, एलिफंटा केव्हज, सोपाराचा स्तूप, या सर्व गोष्टी मुंबई शहराच्या पहिल्यापासून आहेत. मुंबई मध्ये स्थित असलेले टाऊन हॉलच्या पाठीमागे एक कॅस्टल आहे, ज्याला ब्रिटिश काळामध्ये बॉम्बे कॅस्टल असे म्हटले जात असे.

काही वर्षांपूर्वी मुंबई शहर हे फक्त एका किल्ल्यामध्ये वसलेलं शहर होतं. सीएसटी ते फ्लोरा फाउंटन, फ्लोरा फाउंटन ते काळा घोडा आणि काळा घोडा ते लायन गेट अतक्या भागातच एक किलोमीटर लांबी आणि अर्धा किलोमीटर रुंदीमध्ये मुंबई शहर स्थित होते. या ठिकाणाच्या मध्यभागी एक कॅस्टल आहे, ते सहजासहजी पाहण्यासारखं नाही, कारण तिथे आता नेव्हीचे काम चालतं.

एक एकर जागेमध्ये ते कॅस्टल उभारलेले असून त्याला चार बुरुज आहेत, त्यापैकी एक बुरुज पाण्यात असून तीन बुरुजे जमिनीवर आहेत आणि चारही बुरुजांना त्या त्या प्रकारे नावे दिलेली आहेत. त्या पाचशे वर्ष जुन्या इमारतीमध्ये नौदलांमधील वेस्टर्न कमांड हेड त्याजागी बसलेले असतात आणि याबद्दलची माहिती बहुसंख्य मुंबईकरांना माहितीही नाही. पोर्तुगिजांच्या काळामध्ये वसईला मुख्य शहर तर आताच्या मुंबईला त्यावेळी उपनगर म्हणून ओळखले जात होते.

या पाचशे वर्षांपूर्वीच्या इमारतीची रचना पोर्तुगीज गार्सिया द्वारकाने केली आहे. तो व्यवसायाने डॉक्टर असून ज्यू धर्माचा होता, पण त्याकाळी पोर्तुगिज हे कॅथलिक साम्राज्य म्हणून ओळखले जात होते, त्यावेळी दुसऱ्या धर्मातील लोकांना तिकडे वाव दिला जात नसे, त्या कारणाने त्याला कॅथलिकमध्ये धर्मांतर करावे लागले, पण त्याने ज्यू इन प्रायव्हेट राहण्याचा निर्णय घेतला. कालांतराने तो गोव्यामध्ये येऊन गव्हर्नरचा फिजीशियन म्हणून ओळखला जाऊ लागला आणि बहुतेक बेटांपैकी मुंबई हे बेट त्याकाळी त्याने स्वतःच्या मौजमजेसाठी विकत घेतले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments