फेमस

Hollywood actress : नववधूचा नवा लूूक, हिमाचल प्रदेशात लग्न, मुंबईत एन्ट्री

अभिनेत्रीच्या चाहत्यांनी देखील सोशल मीडियावरून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

 Hollywood actress :कोरोना काळात अनेक कलाकारांनी लग्न केले. ज्यात आता बॉलिवुडची अभिनेत्री यामी गौतमी (Yami Gautami) हिचा समावेश होत आहे. गौतमीने आपल्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, यात ती वधूच्या वेशात खूप सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी देखील सोशल मीडियावरून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

यामी गौतमीने ‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’ (Uri: The Surgical Strike) या चित्रपटाचे दिग्दर्शक ‘आदित्य धर’सोबत (Aditya Dhar) लग्न केले आहे. यांचे लग्न हिमाचल प्रदेशात 4 जून रोजी झाले असून गौतमी यामी आणि आदित्य धर आता मुंबईला परतले आहेत.( The newly married couple yami gautam and aditya dhar were snapped at mumbai airport as they arrived after getting married in Mandi,Himachal pradesh  .)

ही जोडी शुक्रवारी मुंबईतील विमानतळावर पोहोचल्याचे दिसून आले. यावेळी अभिनेत्रीने गुलाबी फुलांचा सलवार सूट, हातामध्ये लाल चुडा आणि स्टायलिश बॅग असा लूक केला होता. तर दुसरीकडे आदित्यने ब्ल्यू डेनियम पेयर सह ब्लॅक जॅकेटमध्ये कॅज्युअल लूक परिधान केला होता. कोरोनाच्या नियमांचे पालन करून मुंबई विमानतळावर स्पॉट झाले आहेत. अभिनेत्री यामी गौतम या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे, त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. त्याच बरोबर त्यांचा परिवार देखील त्यांच्यासोबत होता.

अभिनेत्रीने लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, त्यात कॅप्शनमध्ये लिहिले “तुमच्या सानिध्यात मी प्रेम करायला शिकले, तुमच्या आशीर्वादाने आम्ही जिव्हाळ्याच्या नात्याची सुरुवात केली आहे, खूप खाजगी लोक असल्यामुळे आम्ही हा आनंददायी प्रसंग आमच्या जवळच्या कुटुंबासोबत साजरा केला, आम्ही प्रेम आणि मैत्रीच्या प्रवासाला सुरुवात करीत आहोत. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा अशाच आमच्यासोबत असू द्या. असं मत गौतमीने व्यक्त केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments