आपलं शहर

Hotel Taj : जगातील सर्वात मोठ्या ब्रँड हॉटोलची सुरुवात कशी झाली?

Hotel Taj : ताज' जगातील सर्वात मजबूत हॉटेल ब्रँड, जमसेटजी टाटा यांनी हॉटेल उघडले आणि ब्रिटिशांच्या अपमानाचा बदला घेतला.

Hotel Taj : ‘ताज’ हॉटेल म्हणजे टाटा समूहाच्या ‘इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड’ (आयएचसीएल) चा ब्रँड समजला जातो. अलीकडेच जगातील सर्वात बळकट हॉटेल ब्रँड म्हणून या हॉटेलची ओळख झाली आहे. पण या हॉटेलच्या सुरुवातीचा इतिहास तितका कोणाला माहित नाही. हे हॉटेल उघडत टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांनी त्यांच्या अपमानाचा बदला घेतल्याचे म्हटलेtaj hotel tata four 0

ब्रिटनच्या ब्रँड व्हॅल्यूएशन कन्सल्टन्सी ‘ब्रँड फायनान्स’ने आपला वार्षिक ‘हॉटेल्स-50’ अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात टाटा समूहाच्या ताज हॉटेलची ‘जगातील सर्वात मजबूत हॉटेल ब्रँड’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे ब्रिटिशांनी ज्यांच्याकडून या हॉटेलचा बदला घेण्यासाठी पाया घातला होता, त्यांनी आज त्यास जगातील सर्वात भक्कम हॉटेल ब्रँड म्हटले आहे.

taj hotel tata two

ताज’ ब्रँडबद्दल बोलताना ब्रँड फायनान्सचे सीईओ डेव्हिड हेग सांगतात की ताज हॉटेल्सचा 100 वर्षांहून अधिक जुना इतिहास आहे. सध्याच्या कोरोना काळातही ताज हॉटेलमध्ये सगळ्या खबरदारी घेतल्या जात आहेत.

taj hotel tata

टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांना आधुनिक भारताची अनेक स्वप्ने होती. त्यापैकी ‘ताज हॉटेल’ हे एकमेव स्वप्न आहे, जे त्यांनी खरोखरच पूर्ण केले. देशातील पहिले ताज हॉटेल 1903 मध्ये मुंबईच्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ च्या समोर उभारण्यात आले.

jamshetji tata trust two

टाटा समूहाच्या वेबसाईटनुसार, जमशेटजी टाटा यांना परदेशी मित्रांनी एकदा त्यांना मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. पण जेव्हा ते आपल्या मित्रासह तेथे पोचले, तेव्हा हॉटेलच्या मॅनेजर
‘आम्हीं भारतीयांना येऊ देत नाही’ असे म्हणत त्यांना बाहेर रोखले. त्यावेळी बऱ्यचा ब्रिटिश हॉटेलमध्ये वंशविद्वेषण केले जायचे. या गोष्टीने जमशेटजी टाटांना त्रास झाला.

jamshetji tata trust

ताज हॉटेलचा वारसा केवळ त्यास उत्कृष्ट बनवतोच, परंतु त्याचे उभे राहणेदेखील त्यांच्या अभिमानाचा एक भाग आहे. सन 2008 मध्ये जेव्हा 22/11 झाला, तेव्हा ताजमध्येही हल्ला झाला होता. पण त्यानंतर हे होटेल पुन्हा उभारले. ताजच्या परंपरेनुसार केवळ पाहुण्यांची काळजी घेतली जात नाही, तर त्यातील प्रत्येक कर्मचाऱ्यांचीही काळजी घेतली tata logo

“जागतिक आराखड्यावरील भारतीय आतिथ्य उद्योगासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आमच्या पाहुण्यांनी आमच्यावर दाखलेल्या विश्वासाची ही साक्ष म्हणावी लागेल, असे मत आयसीएचएलचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत चटवाल यांनी मांडलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments