आपलं शहर

Mumbai News live : मुंबई जिंकली आता महाराष्ट्राची वेळ, इक्बाल सिंह चहल यांचा मास्टर प्लॅन वाचा…

गेल्या काही दिवसांपासून मुंबईने कोरोनावर मात करण्यात यश मिळवलं आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात कमी होताना दिसत आहेत

Mumbai News live : गेल्या काही दिवसांपासून मुंबईने कोरोनावर मात करण्यात यश मिळवलं आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात कमी होताना दिसत आहेत, सोबतच मृत्यूदरही कमी होत आहे. कोरोना रुग्णांचा डबलिंग रेटही 1 वर्षावर पोहोचला आहे, या सगळ्याचं श्रेय मुंबई पालिकेने (Mumbai Municipal Corporation) केलेल्या कामाला जातं. सध्या मुंबई पालिकेच्या कामाची चर्चा सर्वत्र होत आहे, अनेक ठिकाणी मु्ंबई पॅटर्नचा गाजावाजा होत आहे, त्यातच आता मोठी गोष्ट समोर येत आहे.

मुंबई पालिकाचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी मुंबईत लागू केलेले नियोजन योग्य वाटेवर असल्याचं समजत आहे, त्यामुळे मुंबईत केलेल्या सर्व उपाय योजनांची माहिती चहल यांच्या मार्फत राज्यातील इतर नगरपालिकांसमोर सादर केली जाणार आहे. राज्यातील इतर महापालिकांच्या आयुक्तांशी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज संवाद साधला. त्यासह मुंबईतल्या नियोजनाची माहितीही दिली.

मुंबईत लागू केलेल्या उपाययोजना, नियोजन, अनेक नियमांची अंमलबजावणी अशा सविस्तर मुद्द्यांवर या ऑनलाईन बैठकीत चर्चा करण्यात आली, व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत अनेक प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. (Mumbai Corona Update)

कसं केलं नियोजन

महानगरपालिकेचे कामगार, कर्मचारी, अधिकारी, पोलीस बांधव, पहिल्या फळीमध्ये काम करणारे डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय इत्यादी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मदतीमुळे हे सगळं शक्य झालय, आधी पालिका क्षेत्रातील अशा सर्व फ्रंटलाईन वर्कर्सना धीर देणे गरजेचे असल्याचं चहल यांनी म्हटलं आहे. घर, सोसायटी, रस्ता, गल्ली अशा सर्वच बाबींचा विचार करुन प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम मुंबई पालिकेने केले आहे. (Planning of Mumbai Municipal Corporation)

BMC चं सुक्ष्मनियोजन

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी त्या त्या वार्डनुसार पथकं नेमण्यात आली, सुक्ष्मस्तरिय नियोजन करण्यात आलं, अत्यावश्यक सुविधेतील नागरिकांना विनात्रास कसं रुग्णालय किंवा त्या त्या कामाच्या ठिकाणी कसं पोहोचता येईल, यावर नियोजन करण्यात आलं. मुंबईतल्या 24 प्रशासकीय भागांमध्ये सुक्ष्मनियोजन करण्यात पालिका यश्स्वी झाल्याने आज मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी असल्याचे चहल म्हणतात. धारावीसारख्या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीमध्ये ‘ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रॅकींग, ट्रिटिंग’ या मुद्द्यानुसार नियोजन आखण्यात आलं आणि कोरोनाला वाढण्यापासून रोखण्यात आल्याचं आयुक्त म्हणतात. (BMC’s micro-planning)

पालिकेचं वॉर प्लॅनिंग

प्रत्येक प्रभागातील नागरिकांना सोईस्कर होण्यासाठी त्या त्या प्रभागामध्ये वॉर रूम उभारण्यात आली आणि त्या प्रभागातील नागरिकांना रुग्णालय, रिकामी बेड्स, ऑक्सिजनची माहिती पुरवण्यास सुरुवात केली, यामुळे त्या प्रभागातील रुग्ण आसपास उपाचार घेऊ लागला, जेणेकरून वाहतूकीच्या नियोजन ताण पडला नाही. (Municipal War Room Planning)

अनेकदा ऑक्सिजन संपल्यामुळे रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करावं लागलं, त्यावेळेसही ज्या ठिकाणी बेड्स रिकामी आहेत, तिथे अनेक अॅम्बूलन्सच्या माध्यमातून शिफ्ट करावं लागलं. प्रत्येक वॉर्डमध्ये बीएमसीच्या माध्यमातून 10 रुग्णवाहिकांची सेवा सुरु ठेवल्याने रुग्णांना इतर ठिकाणी शिफ्ट करणे सोप्पे होऊ लागल्याचं चहल यांनी बैठकीत सांगितलं. (Iqbal Singh Chahal interacted with other Municipal Commissioners in Maharashtra)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments