कारण

Video त्यावेळी शिवेसनेसोबत युती केली नसती, तर… फडणवीसांनी सांगितला किस्सा Devendra Fadnavis

23 जून रोजी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी बलिदान दिवस भाजपकडून आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचा सन्मानही करण्यात आला

Devendra Fadnavis : 23 जून रोजी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी बलिदान दिवस (Dr. Shyama Prasad Mukherjee Sacrifice Day) भाजपकडून आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचा सन्मानही करण्यात आला, या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते दवेंद्र फडवणीस (Devendra Fadwanis) यांनी भाऊ तोरसेकरांनी लिहलेल्या एका पुस्तकाचा उल्लेख करत एक खंत समाज माध्यमांसमोर व्यक्त केली. (if there was no alliance with Shiv Sena is better Devendra Fadnavis coment)

या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाऊ तोरसेकर (Bhau Torsekar) यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं उदाहरण देत एक खंत व्यक्त केली. 2019 ची विधानसभा निवडणकू भाजप एकटा लढला तर 150 जागा आणि युतीतून लढला तर विधानसभेच्या 200 जागा आरामात जिंकू शकेल असं मत तोरसेकरांनी आपल्या 2013 च्या पुस्तकात मांडलं होतं. याचाच आधार घेत देवेंद्र फडणवीसांनी ही खंत व्यक्त केली आहे. त्यावेळी आम्ही भाऊ तोरसेकरांचं ऐकलं असतं, तर आजचं चित्र काही वेगळं असतं, असं फडणवीस म्हणाले. मात्र राजकारणात असं होत राहतं, असा दिलासाही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भाषणातून दिला आहे.

भाऊ तोरसेकर यांनी 2013 मध्ये एक पुस्तक लिहलं होतं. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या युतीवरही त्यांनी भाष्य केलं होतं. पुस्तकात असा दावा केला होता की नरेंद्र मोदी 2014 साली बहुमताने केंद्राच्या सत्तेत येतील, तेव्हा अनेकांना हे खोटं वाटलं होतं, पण ते खरं ठरलं 2019 लोकसभा निवडणुकीदरम्यानही भाऊंनी सांगितलं होतं की नरेंद्र मोदी पुन्हा बहुमताने जिंकून केंद्रात आपली सत्ता स्थापन करतील, पण तेव्हा अनेकांना ही गोष्टदेखील पटली नव्हती.

काहीजणांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट आता संपली आहे आणि ते पुन्हा निवडणूक येऊ शकत नाहीत; पण भाऊ बोलले अगदी तसच 2019 साली झालं. त्यावेळी भाजपच्या 302 जागा निवडून आल्या होत्या.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments