फेमस

RIP Flying Sikh : देशाला ओळख देणाऱ्या मिल्खा सिंहांची दमदार कामगिरी…

वयाच्या 91 व्या वर्षी मिल्खा सिंहने घेतला अखेरचा श्वास.

Milkha Singh: भारताचे महान ॲथलिट ‘फ्लाईंग शीख’(Flying Sikh) म्हणजेच मिल्खा सिंह (Milkha Singh) यांचे काल रात्री कोरोनामुळं निधन झाले आहे. 20 मे रोजी त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. चंदीगड मधील पीजीआई(PGI) रुग्णालयात मिल्खा सिंह म्हणजेच ‘फ्लाईंग शीखने’ (Flying Sikh) काल शुक्रवारी रात्री 18 जूनला वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील पाच दिवसापूर्वी मिल्खा सिंह यांच्या पत्नी निर्मल कौर यांचेदेखील निधन झाले होते. (Milkha Singh Passed Away due to Corona)

मिल्खा सिंह यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1929 ला पाकिस्तानच्या पंजाबमध्ये झाला.1958 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत 200 आणि 400 मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक मिळविले. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकवून देणारे हे पहिले खेळाडू होते.1960 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत 400 मीटरच्या शर्यतीत थोडक्यात कांस्यपदक हुकले होते.1962 च्या जकार्ता एशियन गेम्समध्ये 400 मीटरमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले.1962 च्या एशियन गेम्समध्ये 4 बाय 400 मीटर रिलेमध्येही सुवर्णपदकाची कमाई केली होती. तर एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंह यांची 5 सुवर्णपदकांची कमाई होती.

मिल्खा सिंह गुरुवारी कोरोना निगेटिव्ह :
मिल्खा सिंह यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना 30 मे रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. मिल्खा सिंह यांच्या शरिरातील ऑक्सिजन हा कमी(Oxygen is low) झाल्यामुळे त्यांना जवळ असलेल्या पीजीआयएमआर नेहरु हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.(Milkha Singh Thursday Corona Negative)

भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंह यांच्या जीवनावर ‘भाग मिल्खा भाग’(Bhag Milkha bhaag) या नावाचा एक चित्रपट(Movie) देखील बनवण्यात आला होता. पण,या चित्रपटात मिल्खा सिंह यांच्या जीवनातील संघर्ष हा काहीप्रमाणातच दाखवण्यात आला होता. मिल्खा सिंह हे फ्लाईंग शीख (Flying Sikh) या नावाने देखील ते खूप प्रसिद्ध होते. मिल्खा सिंह यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला होता. मिल्खा सिंह यांनी 1968 कॉमनवेल्थ गेम्समध्ये विजेतेपद मिळवले होते. तर त्यांनी 1960 मध्ये झालेल्या च्या ऑलम्पिक स्पर्धेत ते चैौथ्या क्रमांकावर आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ट्विटर मार्फत दुःख व्यक्त :
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मिल्खा सिंह यांना आदरांजली वाहिली आहे. मिल्खा सिंह यांच्या निधनामुळे आपण एका महान खेळाडूला गमावले आहे. त्यांनी अनेक लोकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.(Prime Minister Narendra Modi expresses grief via Twitter)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments