खूप काही

Indian Cricket Team: एका दिवसात 24 विकेट, भारताचा 2 दिवसांत विजय, 119 वर्षानंतर घडला विक्रम

Indian Cricket Team: 2018 च्या जूनमध्ये अफगानीस्थान आणि भारत यांच्यात कसोटी सामना झाला होता.

  • Indian Cricket Team : 2018 च्या जूनमध्ये अफगानीस्थान आणि भारत यांच्यात कसोटी सामना झाला होता. तो इतका रोमहर्षक झाला होता, की सामन्यादरम्यान अनेक विक्रम तयार झाले होते. भारतीय क्रिकेट संघाच्या सलामीवीरांनी दुपारच्या जेवणापूर्वी शतक पूर्ण करून इतिहास रचला होता. हा सामना अनेक बाबतीत ऐतिहासिक असल्याचे सिद्ध झाले होते.

भारतीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान यांच्यातील या कसोटी सामन्याबद्दल बरीच चर्चा होत होती. अफगाणिस्तानच्या संघाला या सामन्यात कठोर मेहनत घ्यावी लागेल, अशी चर्चा होती. मात्र घडलं उलटच.

एका दिवसात 24 गडी बाद होण्याचा विक्रमही या सामन्यादरम्यान झाला होता. पाच दिवसांचा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांवर पूर्ण झाला. 11 वर्षांपासून चर्चेत असलेल्या दोन संघांमधील सामन्यात एक अनोखा इतिहास घडला होता.

सामन्यात अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा कर्णधार होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 474 धावा केल्या. मुरली विजय आणि शिखर धवनने सलामीची जबाबदारी स्वीकारली आणि दोघांनी शतके ठोकली. टीम इंडियाची पहिली विकेट 168 धावांवर कोसळली. 19 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने धवन 96 चेंडूत 107 धावांवर बाद झाला. मात्र कसोटी सामन्यात लंच ब्रेकच्या आधी शतक ठोकणारा धवन हा पहिला भारतीय फलंदाज ठरला होता.

त्याचवेळी विजयने 153 चेंडूत 103 धावा केल्या. केएल राहुलने तिसर्‍या क्रमांकावर 54 तर चेतेश्वर पुजाराने चौथ्या क्रमांकावर 35 धावा केल्या. सातव्या क्रमांकावर येणाऱ्या हार्दिक पांड्याने 71 धावांची खेळी साकारली. अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खानने 34.5 षटकांच्या गोलंदाजीमध्ये 154 धावा देऊन दोन गडी बाद केले. कर्णधार रहाणे व्यतिरिक्त त्याने ईशांत शर्माचीही विकेट घेतली.

अफगाणिस्तान संघ गुंडाळला

भारताने काढलेल्या 474 धावादेखील अफगाणिस्थानसाठी खूप होत्या. अफगाणिस्तानचा पहिला डाव 27.5 षटकांत 109 धावांवर संपला. या डावात मोहम्मद नबीने सर्वाधिक 24 धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने चार, तर इशांत शर्मा आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. यानंतर अफगाणिस्तानने फॉलोऑन खेळत दुसरा डाव सुरू केला.

यात संपूर्ण संघ 38.4 षटकांत केवळ 103 धावांवर गुंडाळला गेला. हशमतुल्लाह शाहदीने नाबाद 36 धावा केल्या तर टीम इंडियाकडून चार विकेट घेणारा जडेजा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. उमेश यादवच्या खात्यात तीन विकेट्स आल्या. अवघ्या दोन दिवसांत भारताने हा सामना 262 धावांनी आपल्या नावावर केला.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments