खूप काही

Health Department : राज्याच्या आरोग्य विभागात जाहीर केले 2226 पदनिर्मितीचे आदेश…

राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आरोग्य विभागात करण्यात आली पदनिर्मिती.

Health Department : राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी गेल्या महिन्यात दिली होती. आता त्यासाठीच आरोग्य मंत्रालयाने एक पाऊल पुढं टाकून 2,226 पदांच्या निर्मितीसाठी शासकीय आदेश जाहिर करण्यात आले आहेत. राज्यातील एकूण 118 आरोग्य संस्थांकरीता 812 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 1184 कुशल मनुष्यबळ सेवा, 226 अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण 2,226 पदे उपलब्ध करुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहिर केलेल्या या आदेशात असे सांगण्यात आले आहे की, या 2,226 पदांपैकी काही पदे नियमित, तर काही कंत्राटी पद्धतीने निर्माण करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर युनिट यासाठी ही पदे निर्माण केली आहेत. सध्याच्या परिस्थितीत केवळ पदनिर्मितीचे आदेश जाहिर करण्यात आले आहेत, पण या भरतीच्या प्रक्रियेची कोणतीही माहिती यामधे देण्यात आलेली नाही.

सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहिर केलेल्या या जाहिरातीत आरोग्य अधिकारी, परिचारिका, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, स्त्री आणि पुरुष परिचालक, लिपिक, कक्ष सेवक, शिपाई, वाहन चालक, सफाई कामगार या पदांसाठी निर्मिती करण्यात आली आहे.

राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या महिन्यात दिली होती. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती यात करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी आदेश जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

या अगोदर राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता 50 टक्के भरती करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु राज्यातील वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी अशी मागणी केली होती. येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यावेळी राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता असल्याने ही शक्यता लक्षात घेऊन राज्यातील भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी, ज्यामुळे क आणि ड वर्गातील कर्मचारी वाढतील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments