फेमस

Khushis Bikini Look : बिकनीच्या बोल्ड अंदाजात श्रीदेवीच्या लेकीने केलं घायाळ

बॉलिवूड एक्टरेस जाह्नवी कपूरची बहीण खुशी कपूर ही बॉलिवूडपासून दूर असूनही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

Khushis Bikini Look : बॉलिवूड एक्टरेस जाह्नवी कपूर (Bollywood Actress Janvi Kapoor) यांची बहीण खुशी कपूर (Khushi Kapoor) ही बॉलिवूडपासून दूर असूनही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. आत्ताच तिने आपले बिकनी लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिचा हॉट लुक पाहायला मिळत आहे.

खुशीच्या फोटोवर अनेक स्टार किड्सने कमेंट करताना फोटोला पसंती दिली आहे. तरआलिया कश्यप, माहीप कपूर यांनी कमेंट्सद्वारे खुशीचे कौतुक केले आहे, अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा यांनीही खुशीच्या पोस्टवर ‘क्यूट’ अशी कमेंट्स केले आहे. तिच्या या फोटोतील हॉट लूक चाहत्यांना घायाळ करतो.

खुशीचे जांभळ्या रंगाच्या बिकनीत, मोकळे केस आणि काळा रंगाचा गॉगल घालून पोझिंग करतानाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफानसारखे वायरल झाले आहे, तीने हे शूट हिल स्टेशनवर एन्जॉय करताना केले आहे. 18 तासात एक लाख चाहत्यांना या पोस्ट आवडल्या आहेत.

खुशी कपूर अमेरिकेत अभिनयाचा अभ्यास करत आहे. सध्या ती भारतात आहे आणि गेल्या काही दिवसांपासून तिची बहीण जान्हवी कपूरसोबत वेळ घालवत होती. काही काळापूर्वी जानवी कपूरने ही आपले बिकनी लुक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, तर छोटी बहिण खुशीचादेखील बिकनी लुक आता चाहत्यांचे चर्चेमध्ये आहे.

खुशी सध्यातरी बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments