आपलं शहर

Mahad colony : म्हाडा वसाहतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांना मोठा दिलासा

Mahad colony : अभय योजने अंतर्गत मुंबईतील म्हाडाच्या वसाहतीत राहणार्‍या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mahad colony : अभय योजने अंतर्गत मुंबईतील म्हाडाच्या वसाहतीत राहणार्‍या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

1 एप्रिल 1998 ते 2021 पर्यंतच्या थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे, त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांना याचा दिलासा मिळाला आहे.

गेली 21-22 वर्ष नागरिकांनी सेवा शुल्क भरले नव्हते, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही अभय योजना सुरू केली. त्यानुसार आम्ही थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तसेच थकीत सेवा शुल्क एकत्र न भरता 5 वर्षात 10 हप्त्यात भरू शकता, अशी सवलतही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

म्हाडाच्या इमारतीत राहणार्‍या 1 लाख 81 हजार रहिवाशांना या सवलतीचा फायदा होणार असून आता म्हाडात जाऊन रांगेत उभं राहून बिल भरायचं बंद होईल, ऑनलाइन प्रणालीद्वारे तुम्ही घरबसल्या सेवा शुल्क भरू शकता, अशी माहिती म्हाडा अधिकाऱ्यांनी दिली आहे. म्हाडाच्या 4 हजार 973 इमारतीत एकूण 1 लाख 46 हजार 382 रहिवासी राहतात, त्या सर्व रहिवाश्यांना या सवलतीचा फायदा होणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments