आपलं शहर

Malad building collapse: मालाडमधील इमारत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू….

इमारतातील दोन कुटुंब उध्वस्त, तर एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू. 6 लहान मूलांचा देखील यात समावेश.

Malad building collapse: बुधवारी मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईत थैमान घातले. त्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यातच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. 9 तारखेला रात्री 11:15 च्या सुमारास मालवणी गेट क्रमांक 8, मालाड पश्चिमेला न्यू कलेक्टर कंपाउंड परिसरातील एक इमारत कोसळली.

11 जणांचा मृत्यू 17 जण जखमी
दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे ही इमारत कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात 6 लहान मुलांचा देखील समावेश आहे. (A building collapse in Malad area killed 11 people and injured 17 others)

एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू
या इमारतीत राहणारे दोन कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबप्रमुख मोहम्मद रफी यांनी दिली आहे. यांनी सांगितले की, मी दूध आणायला गेलो होतो म्हणून मी वाचलो. मात्र मी जेव्हा घरी परत आलो त्यावेळी इमारत पूर्णपणे कोसळली होती आणि माझं कुटुंब इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गेल असल्याचे समजल्यावर माझ्या अंगावर काटा आला.(Nine members of the same family die in a building in Malad)

मोहम्मद रफी यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, भाऊ, भावजय आणि सात लहान मुले देखील होती. या सर्वांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले.

अग्निशमक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी
बुधवारी रात्री या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, अजूनही तिथे बचावकार्य सुरू आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेचे इतर प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले. (Eight fire trucks arrived at the scene after the building collapsed)

इमारत अनधिकृत असल्याची माहिती मिळाली
ही एक मजली इमारत अनधिकृत असून या इमारतीवर अजून दोन मजले वाढवण्यात आले होते. त्याचबरोबर या बिल्डिंगच्या बाजूची इमारत देखील धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम केले आहे.(The building was already said to be unauthorized)

मृतांची संख्या वाढू शकते
ढिगाऱ्याखाली काही निवासी अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहे त्यामुळे मृतांची संख्या देखील वाढू शकते. त्याचबरोबर दुर्घटनेतून वाचवण्यात आलेल्या लोकांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.(The death toll could rise)

पावसाने केले मुंबईला हैराण
पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले, सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली. सायन, किंग सर्कल, हिंदमाता या ठिकाणी पाणी तुंबले. रेल्वेसेवा बंद झाली. प्रामुख्याने मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, नवी मुंबई येथे जोरदार पाऊस पाहायला मिळाला.(Heavy rains begin in Mumbai from Wednesday morning)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments