कारण

Maratha Reservation | मराठा आरक्षणाचा तिढा आज सुटणार? वाचा PM-CM च्या बैठकीत काय ठरणार

या भेटीदरम्यान मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, तौक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान, जीएसटी, लसीकरण आणि इतर विषयांवर यांच्यात चर्चा होणार आहे.

Maratha reservation: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचबरोबर एक शिष्टमंडळ आज दिल्लीमध्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, तौक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान, जीएसटी, लसीकरण आणि इतर विषयांवर यांच्यात चर्चा होणार आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकीला सुरुवात
पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ विशेष विमानाने सकाळी सात वाजता दिल्लीकडे रवाना झाले आहे. 15 मिनिट आधीपासूनच मुखमंत्र्यांनी दिल्ली मार्गावरील पंतप्रधान निवास येते उपस्थिती लावली होती. 11:05 मिनिटांनी या बैठकीला सुरूवात झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील या बैठकीत उपस्थित आहेत. मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की नाही याबाबतचा निर्णय काही वेळातच समोर होईल. या बैठकीनंतर दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार. (Beginning of the meeting between the Prime Minister and the Chief Minister)

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल एक तास बैठक झाली. ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवास स्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर झाली. पंतप्रधानांबरोबर होणाऱ्या बैठकीत कोणते मुद्दे मांडायचे आणि भेटीत काय मुद्दे असतील याबाबत ही बैठक होती.(Meeting between Chief Minister and Deputy Chief Minister)

दिलीप पाटील आणि एकनाथ शिंदे देखील होते उपस्थित
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये मराठा आरक्षण विषयी चर्चा झाली. राज्यातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतील तरच शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा होते. त्याचबरोबर बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये आरक्षण विषयी चर्चा झाली.(Dilip Patil and Eknath Shinde were also present)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments