Mayor Kishori Pednekar :मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते महापौर किशोरी पेडणेकर यांचा सत्कार
महापौर किशोरी पेडणेकर यांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.

Mayor Kishori Pednekar :करोना काळात गेल्या दोन वर्षांत नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. या काळात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना सातत्याने आरोग्य सेवा उपलब्ध करुन धडाडीची कामगिरी केली.
“वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन” यांनी किशोरी पेडणेकर यांचे कौतुक करून गौरवही केला आहे.
“वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन”चे अध्यक्ष संतोष शुक्ला यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र अध्यक्ष ‘फरान सुलतान अहमद’ यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापौर किशोरी पेडणेकर यांना पुष्पगुच्छ देऊन यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर सोमवारी 21 जून रोजी पार पडला.
यावेळी मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार राहुल शेवाळे, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, सभागृह नेते विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे देखील उपस्थितीत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील महापौर किशोरी पेडणेकर यांना शुभेच्छा देऊन पुढील काळातही नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे अश्वासन दिले आहे. किशोरी पेडणेकर यांचा आम्हाला अभिमानच आहे परंतु इतर महिलांसाठीही त्यांची ही कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे. असे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांच्या धडाडी आणि उत्साही कार्याची दखल घेऊन आम्ही “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन” देऊन त्यांचा सन्मान करत असल्याचे मत फरान सुलतान अहमद यांनी मांडले आहे.