Milkha Singh Death: मिल्खा सिंह यांचे निधन, PM नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
असंख्य भारतीयांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले लोकांना त्यांनी प्रेरणा दिली

Milkha Singh Death: भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे, वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची बाधा झाली होती, त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलमध्ये सांगितले होते, पण आज अखेर मिल्खासिंग यांच्या निधनाची बातमी समोर आली. मिल्खा सिंग यांचा शरीरात ऑक्सिजनची लेव्हल 56 पर्यंत गेली होती. 18 जून रात्री 11:30 वाजता त्यांचे निधन झाले.
मिल्खा सिंग हे देशाचे पहिले ट्रॅक आणि फिल्म सुपरस्टार होते. भारताला पहिले सुवर्ण पदक( Gold medals) मिल्खासिंग यांनी जिंकून दिले, भारताचा पद्मश्री हा किताबही त्यांना मिळाला होता. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये बरेच सुवर्णपदके पटकावली होती. 1958 साली झालेली राष्ट्रीय स्कूल क्रीडा स्पर्धा त्यानंतर 1960 साली झालेली रोममधील ऑलम्पिक स्पर्धा मिल्खासिंग यांनी गाजवली होती. त्यांच्या आत्मकथेवर,”भाग मिल्खा भाग” हा चित्रपटदेखील बनवण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पत्नी निर्मला सिंग यांचेही कोरोनाने निधन झाले.
पत्नी निर्मला कोर (wife nirmal koir)
निर्मला भारतीय व्हॉलिबॉल संघाचा माजी कर्णधार होत्या. रोम ऑलिंपिकनंतर त्यांनी मिल्खा सिंग यांच्याशी विवाह केला. मिल्खासिंग कोरोनाची लागण झाल्याने काही दिवसांनी पत्नीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदीकडून आदरांजली (PM NARENDRA MODI )
“देशाने एक महान खेळाडूला आज गमावला आहे. मिल्खा सिंह यांच्यासाठी भारतीयांच्या मनात एक खास जागा होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाने अनेक त्यांचे चाहते होते. असंख्य भारतीयांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले लोकांना त्यांनी प्रेरणा दिली.त्यांच्या निधनाची वार्ता ऐकल्यानंतर मला दु:ख झाले”, असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले आहे.
भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांचे निधन ; वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास#MilkhaSingh #MilkhaSinghDeath https://t.co/9ehuHMgOpY
— ABP माझा (@abpmajhatv) June 19, 2021