Uncategorized

Ministry of Home Affairs : मंत्रालयात बॉम्ब ठेवणारा ताब्यात, निघाला भाजपचा माजी पदाधिकारी, सांगितलं मोठं कारण

Ministry of Home Affairs : मंत्रालयातील गृहविभागात बॉम्ब ठेवल्याचा मेल पाठवणाऱ्यास अखेर ताब्यात घेण्यात आलं आहे.

Ministry of Home Affairs :  मंत्रालयातील गृहविभागात बॉम्ब ठेवल्याचा मेल पाठवणाऱ्यास अखेर ताब्यात घेण्यात आलं आहे. पुण्यातून या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. संबंधित तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून अनेक खुलासे झाले आहे आहेत.

मुलाला शाळेत अ‍ॅडिमिशन मिळाले नाही, म्हणून शैलेश शिंदे नामक तरुणाने मंत्रालयाच्या गृहविभागात बॉम्ब ठेवल्याचा मेल केला होता, असे मत शैलेशने मुंढवा पोलिसांनी सुरु केलेल्या चर्चेत म्हटलं आहे.

मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा मेल सोमवारी सायंकाळी गृह मंत्रालयाला मिळाला होता. त्यानंतर सायंकाळी ६ वाजल्यापासून मंत्रालयातील सुरक्षा विभागाने ( Security Department) सर्च ऑपरेशन सुरु केले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांचे तातडीने बॉम्बनाशक आणि शोधक पथक मंत्रालय परिसरात पोहचले.

मुंबई पोलिसांकडून सर्व मंत्रालय पिंजून काढण्यात आले होते. दरम्यान, दुसरीकडे हा मेल कोणाकडून आला याचाही शोध सुरु करण्यात आला होता. अखेर मेल पाठवणारा पुण्यातील शैलेश शिंदे नामक व्यक्ती आहे आणि सध्या ही व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मुंबई पोलिसातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांनी तातडीने ही माहिती पुणे पोलिसांना दिली. मुंढवा पोलिसांनी घोरपडी येथून शैलेश याला तातडीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता मुलाला शाळेत अ‍ॅडमिशन मिळाले नाही, या रागातून त्याने हा मेल केल्याचे सांगण्यात आले. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी शैलेश शिंदे याला ताब्यात घेतले आहे.

मुंबई मंत्रालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा शैलेश शिंदे हा आरोपी भाजपचा माजी पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे. शैलेश शिंदे यांचा मुलगा पुण्यातील वानवडी परिसरातील हॅचिंग्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतोय. मात्र, शाळा व्यवस्थापन फी आणि इतर मुद्यावर त्यांच्या मुलाला प्रवेश देत नसल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय.

याबाबत शिक्षण उपसंचालक, शिक्षणमंत्री यांना तब्बल 150 मेल केले होते मात्र त्यावर उत्तर न आल्याने त्यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी धमकीचा मेल केल्याचे शिंदे यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आलंय.

शिंदे हे पुण्यातील घोरपडीच्या बि. टी. कवडे रोड परिसरातील इस्टर्न कोर्ट या इमारतीत राहत असून सध्या शहरात जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. शिंदे यांचा मुलगा पाचवीपासून हाचिंग्स या शाळेत शिकत होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments