आपलं शहर

Monsoon update: पाऊस करणार आठवडाभर आराम..

पुढील आठवडाभर पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे...

Monsoon update: गेल्या आठवड्यामध्ये पावसाने थैमान घातले होते. जूनच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये एका महिन्याचा पाऊस झाला होता. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्या परिणामला मुंबईसह इतर शहरांना देखील सामोरे जावे लागले. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

पुढील आठवडाभर पाऊस पडणार नाही
आठवडाभर होणारा पाऊस रविवार पासून कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की, आता पुढील आठवडाभर पाऊस पडणार नाही. चक्क पावसाने आठवडाभर आराम करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवस पाऊस नसल्याने पुन्हा एकदा तापमान वाढत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील आठवडाभर पाऊस होणार नाही.(It will not rain for the next full week)

पाऊस का होणार नाही?
पाऊस न होण्याचे कारण देखील हवामान शास्त्रज्ञांकडून समजले आहे. सहारा भागातून येणाऱ्या धूलिकणांमुळे ढगांची निर्मिती होऊ शकत नाही आणि ढगांची निर्मिती न झाल्याने पाऊस होणार नाही. असे शास्त्रज्ञांकडून समजले आहे.

पावसावर सहारा भागातून येणाऱ्या धूलिकणांचा परिणाम झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे राज्यात पुढचा आठवडाभर पाऊस पडणार नाही असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.(Why isn’t it raining for the next week?)

पावसाला सुरुवात झाल्याने अनेक भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. परंतु पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा पेरणी करण्याची वेळ येऊ शकते. त्याचबरोबर कोकण किनारपट्टी भागातदेखील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments