आपलं शहर

Monsoon update: मुसळधार पावसाने कुर्ला-सायन येथील लोकल सेवा बंद

कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल बंद करण्यात आल्या आहेत. तर ट्रान्सहार्बर आणि पश्चिम रेल्वे वाहतूक सुरू आहे.

Monsoon update: हवामान खात्याने महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह इतर राज्याच्या किनारपट्टी भागात सलग पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता मुंबईतील स्थानिक हवामान खात्याने वर्तवली होती.

पाणी साचल्याने लोकलसेवा बंद
मुंबई शहरामध्ये आज पहाटेपासूनच मान्सून जोरदार सक्रिय झाला आहे. जोरदार पावसामुळे कुर्ला आणि सायन येथे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सेंट्रल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल बंद करण्यात आल्या आहेत. तर ट्रान्सहार्बर आणि पश्चिम रेल्वे वाहतूक सुरू आहे.(local Train closed due to heavy rain water)

पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांसाठी महानगरपालिका सज्ज
हवामान खात्याने गेल्या शनिवारपासूनच मान्सून रत्नागिरीच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचल्याचे जाहीर केले होते. आज मान्सून मुंबईमध्ये दाखल झाला आहे. पावसात पाणी साचणे आणि इतर समस्या निर्माण होतात म्हणून महानगरपालिका प्रशासनही आधीपासूनच सज्ज झाले आहे.(Municipal Corporation ready for problems arising in rainy season)

बंगालच्या उपसागरात निर्माण झाला कमी दाबाचा पट्टा
बंगालच्या उपसागरात हालचाल होत असल्याची सूचना देखील हवामान खात्याने दिली होती. परंतु आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह इतर किनारपट्टी भागात देखील पुढील तीन दिवस जोरदार होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.(A low pressure belt formed in the Bay of Bengal)

अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस
मंगळवारी मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. तर आज मुंबईमधील महालक्ष्मी, कुलाबा आणि दादर भागांमध्ये 20 मि. मी. ते 40 मि. मी. तर उत्तर मुंबईमध्ये बोरिवली, चिंचोली आणि दहिसर भागात 60 मि. मी. इतका पाऊस नोंदला गेला.(Heavy rain in many cities)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments