खूप काही

Monsoon update: मुंबईमध्ये सलग पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा, पालिकेची काय तयारी

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 10 जूनपासून मान्सूनला सुरुवात होणार आहे.

Monsoon update: अतिवृष्टीच्या काळात गरज पडेल तिथे NDRF आणि SDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आज सकाळपासून नालासोपारा, बोरिवली भागांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी साचेल अशा भागात 447 पंप बसवण्यात आले आहेत.

बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो
हवामान खात्याने बंगालच्या खाडीमध्ये नैसर्गिक हालचाल होत असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे बंगालच्या उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहार झारखंड या ठिकाणी याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्याचबरोब याचा फटका मराठवाडा, तेलंगणा आणि तमिनाडूतही बसू शकतो.(A low pressure belt may form in Bengal)

मुंबईमध्ये पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह इतर राज्याच्या किनारपट्टी भागात पुढील पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता मुंबईतील स्थानिक हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर आज सकाळपासून बोरीवली, नालासोपारा कांदिवली, वसई या भागांमध्ये जोरदार विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.(Five days of torrential rains expected in Mumbai)

मुंबईतील चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला
रविवारी रात्री दोनच्या सुमारास मुंबईमधील चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेमध्ये 5 जण जखमी असून, एकचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील सायन परिसरातही जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या अनेक भागात पावसाळ्याच्या आगमनाची परिस्थिती निर्माण झाली आहे.(Part of a four-storey building in Mumbai collapsed)

महाराष्ट्रात 10 जूनपासून मान्सूनला सुरुवात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मान्सून परिस्थितीचा आढावा घेत कोणत्याही संकटाला समोर जाण्यासाठी तयार राहा असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने देखील लोकांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात योग्य ते आदेश दिले आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 10 जूनपासून मान्सूनला सुरुवात होणार आहे.(Monsoon starts from June 10 in Maharashtra)

लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचे आदेश
प्रशासनाने किनारपट्टीलगतच्या लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचण्याच्या आदेश दिले आहेत. तर अतिवृष्टी काळामध्ये NDRF आणि SDRF तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जुन्या धोकादायक इमारती, दरड कोसळणाऱ्या भागातील लोकांना देखील सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.(Administration orders for the safety of the people)

पाणी साचेल अशा ठिकाणी 447 पंप बसविण्यात आले आहेत
इक्बाल सिंह चहल यांनी एका बैठकीत सांगितले की, जोरदार पावसामुळे पाणी साचण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी 447 पंप बसवण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाणीटंचाईचा देखील प्रश्न सोडवण्याचा मार्ग काढला आहे. हिंदमाता परिसरात दोन मोठे टॅन्क ठेवले आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साठवण्यात येत आहे. प्रत्येक वॉर्डमधील पाच शाळा तयार केल्या असून, गरजू लोकांना त्या शाळेमध्ये स्थलांतरित केले जाईल.(447 pumps have been installed at places where water will be stored)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments