आपलं शहर

Monsoon update: जूनमध्ये पहिल्या 10 दिवसात महिनाभराच्या पावसाची नोंद..

हवामान खात्याने दिनांक 13 आणि 14 ला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Monsoon update: मुंबईत रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जूनच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये एका महिन्याचा पाऊस झाला आहे. त्याचबरोबर उपनगरांमध्ये देखील सतत पाऊस आहे. हवामान खात्याने दिनांक 13 आणि 14 ला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने याचा परिणाम मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी दिसून येतोय. त्याचबरोबर कोकणात देखील मुसळधार पाऊस पडणार असून पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे.(The meteorological department has warned of heavy rains on the 13th and 14th)

महानगरपालिका देखील सज्ज
महानगरपालिका देखील यासाठी सज्ज झाली आहे. आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर किनार्‍यालगत राहणार्‍या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्यामुळे समुद्रकिनारी आणि धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन देखील केले जात आहे.(bmc is also ready)

महानगरपालिकेच्या शाळांना बनवले निवारा केंद्र
काही तासाच्या पावसातच मुंबईमध्ये पाणी साचते, त्यामुळे पाणी उपसा पंप ही तयार ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर पालिकेच्या शाळांना तात्पुरते निवारा केंद्र म्हणून घोषित करण्यात आले. घरात पाणी साचल्यास त्या कुटुंबांना शाळेत हलवण्यात येईल.(Municipal schools have been made shelter centers)

दहा दिवसात महिनाभराच्या पावसाची नोंद
मुंबई उपनगरातील पावसाची एकूण सरासरी संपूर्ण जून महिन्यासाठी 505 मिलिमीटर असते. मात्र यावर्षी एक ते अकरा जून या दरम्यान 534 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दहा दिवसातच पूर्ण महिनाभराच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.(Record of month-long rainfall in ten days)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments