आपलं शहर

BMC च्या 200 कर्मचाऱ्यांचे कोरोनाने निधन, पालिकेकडून इतक्या मदतीची घोषणा

कोरोना काळात आपले कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या जवळपास 220 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत कोरोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मुंबईमधील महानगरपालिकेच्या 200 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

200 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू
बीएमसीच्या 200 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा आणि अधिकार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये महानगरपालिकेचे रस्ता विभाग, साफसफाई विभाग, आरोग्य विभाग या कर्मचाऱ्यांचा आणि अधिकार्‍यांचा समावेश आहे.(More than 200 BMC employees die due to corona)

महानगरपालिकेतर्फे विमा कवच
कोरोनामुळे मुंबई महानगरपालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे अशा कर्मचार्‍यांना आणि अधिकाऱ्यांना महानगरपालिका विमा कवच देत आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
(Insurance cover by BMC)

50 लाख रुपयांची विमा योजना
विमा योजनेअंतर्गत महानगरपालिकेने कर्मचारी, कंत्राटी कामगार, रोजंदार, मानसेवी कर्मचारी या विभागातील मृत्यू झालेल्यांसाठी 50 लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यापैकी फक्त 96 कर्मचाऱ्यांनाच विमा योजनेचा लाभ घेता आला आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना देखील विमा योजना देण्यात येणार आहे असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.(Insurance plan of Rs. 50 lakhs)

उर्वरित कर्मचाऱ्यांना देखील घेता येणार विमा योजनेचा लाभ
कोरोना काळात आपले कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या जवळपास 220 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विमा कवच लवकरच सर्वांना देण्यात येईल. सर्वेक्षण, शोध, प्रतिबंध चाचणी, उपचार आणि मदत आशा विविध कार्याशी संबंधित असणाऱ्या कार्यरत कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.(Employees can avail the benefits of the insurance plan)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments