खूप काही

MSRTC News:महाराष्ट्राच्या ‘लालपरी’ला 73वर्षे पुर्ण,प्रसंगी परिवहन महामंडळाकडून अनेक योजनांच्या घोषणा,वाचा सविस्तर माहिती….

परिवहन महामंडळाने एसटीच्या 73व्या वर्धापनदिनी अनेक नव्या योजनांच्या घोषणा केल्या.

MSRTC News:सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या जाळ्यात अडकून प्राण गमावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे.

कोरोनामुळे आपले प्राण गमावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य परिवहन महामंडळ भक्कमपणे उभे राहिल व शासनाच्या निकषात बसत नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना परिवहन महामंडळाच्या वतीने 5 लाख रूपयांची मदत देण्यात येईल.तसेच सरकारच्या वतीने कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या 50 लाख रुपयाच्या योजनेसाठीची मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे अशी घोषणा मंत्री, ॲड. परब यांनी केली.

गेली अनेक वर्षे प्रवाशांच्या सेवेसाठी सतत कार्यरत असणारी ‘लालपरी’ म्हणजेच एसटीने 74व्या वर्षात आपले पाऊल ठेवले आहे. प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात कायम स्थान असणाऱ्या एसटीचा मंगळवारी(1 जून 2021 रोजी) 73व्या वर्धापनदिन पार पडला. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच महामंडळातील विविध विभागांचे महाव्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

एसटीच्या वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देताना अॅड. अनिल परब यांनी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि कोरोनाच्या बिकट परिस्थितीत देखील आपले कर्तव्य बजावून सतत कार्य करणाऱ्या इतर कामगारवर्गाशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० लाख रूपये देण्याची राज्य सरकारने योजना घोषित केली होती. सरकारची ही योजना गेल्यावर्षी महामंडळाच्या वर्धापनदिनी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीही लागू केली होती. या योजनेची मुदत 30 डिसेंबरपर्यंत होती. मात्र,शासनाने या योजनेचा कालावधी नंतर 30 जूनपर्यंत वाढवला. परंतु, राज्य परिवहन महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या योजनेचा कालावधी वाढवला नव्हता. त्यामुळे वर्धापनदिनाचे औचित्य साधत मंत्री, ॲड.परब यांनी हा कालावधी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील 30 जून 2021 पर्यंत वाढविला असल्याचे घोषित केले. मात्र, कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, परंतु जे शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे 5 लाख रूपयांची मदत देण्याचे ॲड. परब यांनी जाहिर केले.

कोरोनामुळे राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केल्यामुळे त्याचा एसटीच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात चढ-उतार आला आहे. अशा परिस्थितीत एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे सांगतानाच एसटी परिवहन महामंडळासमोर कितीही संकटे आली तरीदेखील कोणत्याही कर्मचार्‍याला आपली नोकरी गमवावी लागणार नाही अशा शब्दात अ‍ॅड.परब यांनी कामगारांना दिलासा दिला.

सध्या एसटी बिकट परिस्थितीतून वाटचाल जरी करत असली तरीदेखील लवकरच पुन्हा एकदा एसटी महामंडळाला आर्थिक दृष्ट्या भक्कम करण्यासाठी योग्यता योजना राबवल्या जातील आणि सामान्य लोकांची ही जीवनवाहिनी पुन: एकदा सक्षमपणे कार्य करेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सहा महिन्यांत नोकरी…

कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी कोरोना वॉरियर्स म्हणून एसटीचा कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरला होता. मात्र, एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊन त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना येत्या सहा महिन्यांमध्ये अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी यावेळी प्रशासनाला दिले. (Heirs of ST employees get jobs in six months …)

महाकार्गोच्या चालकांना 150 रूपये भत्ता

कोरोना काळात गेल्यावर्षी एसटी महामंडळाने व्यावसायिक मालवाहतूक क्षेत्रात दमदारपणे पदार्पण केले. खासगी वाहतूकीच्या तुलनेत किफायतशीर दर असल्याने एसटीची ’महाकार्गो’ ही मालवाहतूक सेवा उपयुक्त ठरू लागली आहे. मालवाहतूक करताना चालकांना अनेकदा परगावी जावे लागते. तेथे त्यांना अनेकदा मुक्काम करावा लागतो. अशावेळी त्यांना पदरमोड करून आपला खर्च भागवावा लागतो. त्यामुळे अशा चालकांना परगावी मुक्काम करावा लागल्यास त्यांना सरसकट 150 रूपये प्रतिदिन भत्ता देण्याची घोषणा मंत्री,अ‍ॅड, परब यांनी केली.(Rs 150 allowance for Mahacargo drivers)

बस स्थानकावरदेखील नवीन सुविधांची अंमलबजावणी.

1.प्रवाशांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी वेगवेगळ्या तालुक्यांना जोडणार्‍या काही प्रमुख 100 स्थानकांवर आरओच्या माध्यमातून पाण्याची सुविधा केली जाणार आहे. (Water will be facilitated through RO at some of the major 100 stations.)

2.एसटी स्थानकांवर प्रवाशांच्या स्वच्छतेसाठी थोडासा दर आकारून स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. (Toilet facilities will be provided.)

3. प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य शासनाने लवकरच अडीच हजार नवीन बसगाड्या विकत घेण्याची तरतूद केली आहे यात पर्यावरवणपूरक अशा इलेक्ट्रीक बस, एलएनजी, सीएनजी, साध्या तसेच आराम गाड्यांचा समावेश असेल. (Provision has been made to purchase two and a half thousand new buses)

4. राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC-Maharastra state road transport corporation) योजना, सेवा तसेच महामंडळाची विविध माहिती अधिकाधिक प्रवाशांपर्यत पोहोचवण्यासाठी एसटीने आपले स्वतःचे ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम व टेलीग्राम या समाजमाध्यमांवर आपले अधिकृत खाते उघडले आहे.(Implementation of new facilities at bus stand also)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments