आपलं शहर

Mumabai Rain :पहिल्याच पावसात मुंबईकरांची दानादान, अनेक ठिकाणचे रस्ते बंद

दक्षिण मुंबईत सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

Mumabai Rain :मुंबईमध्ये मान्सूनचे (Mumbai Weather update) आगमन झाले आहे. मुंबईसह उपनगरात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. पण, पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाल्याचं पाहायला मिळत आहे.

रात्रभर पावसाने चांगलंच झोडपलं आहे. अजूनही हा पाऊस मुंबईच्या अनेक भागात सुरु आहे. दक्षिण मुंबईत सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरं (Suburban city) म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे अनेकठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

अंधेरीसह अनेक भागांत पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. पाणी साचल्यामुळे अंधेरीमधील सबवे तात्काळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. अनेकजणांना वाहतुकीदरम्यान अडचणी निर्माण होत आहेत. परंतु संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेल्याने रस्त्याशेजारी असलेल्या घरांमध्येदेखील पाणी शिरलं आहे. त्याचबरोबर मालाड येथील सबवेदेखील बंद करण्यात आला आहे.

तेच पाहता दहिसर पूर्व जयराज बिल्डींगमध्ये पाणी घुसलेले पाहायला मिळत आहे, यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे.पावसाचा प्रभाव जास्त असल्याने कांदिवली पश्चिम येथे 90 फीट रोडवर पाणी भरले आहे. पहिल्याच पावसाने नागरिकांची दाणादाण उडवल्याने पालिकेने नालेसफाईचं काम केलं की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments