Mumai building collapse : मुख्यमंत्र्यांने घेतली जखमींची भेट, केली मोठी घोषणा
मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबांना मदत मिळवण्यासाठी प्रस्ताव जाहीर केला,

Mumbai building collapse : मुंबईतील मुसळधार पावसामुळे मालाडच्या गेट नंबर 8 वरील इमारतिचा काही भाग कोसळला आहे. यामध्ये काहीजण जखमी, तर काहींचा मृत्यू झाला आहे, या सगळ्यांची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे.
घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या रहिवाशांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची तसेच जखमींवरील उपचारांचा खर्च राज्य सरकारमार्फत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यावेळी आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त इक्बाल सिंग, मिलिंद बोरीकर हे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांना या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्त बरोबर अग्निशामक दल, महापालिका इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले तर याठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देणार असून जखमींना पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे, मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबांना मदत मिळवण्यासाठी प्रस्ताव जाहीर केला, तसेच जखमींना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत. तर त्याच ठिकाणी इमारतीच्या उर्वरित भागातील घरांसाठी तात्पुरत्या निवाऱ्यासाठी व्यवस्था करण्यात यावी अशी सूचना प्रशासनाला दिली आहे.