आपलं शहर

Mumbai Airport update:महाराष्ट्रातील हवाई प्रवाशांसाठी नवे नियम जाहिर,पहा काय आहेत नियम….

सर्व देशी हवाई प्रवाशांना मुंबईत उतरल्यावर आरटी-पीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक केलेला नाही.

Mumbai Airport update:महाराष्ट्रात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊनही महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्याच्या निर्णयाच्या दरम्यान ही बातमी समोर आली आहे की,महाराष्ट्रातील विमानतळांवरून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai’s Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) येणार्‍या स्थानिक प्रवाशांना (domestic Passengers) शहरात उतरल्यावर आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणीतून सूट देण्यात आली आहे. (New rules for air passengers in Maharashtra announced, see what are the rules.)

सध्या इतर राज्याकडून महाराष्ट्रात येणार्‍या सर्व प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणीद्वारे कोरोना संसर्गाचे नकारात्मक अहवाल आणणे बंधनकारक आहे असा आदेश मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation-BMC) आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी जारी केला आहे.

तर राज्य सरकारने महाराष्ट्रातल्या विमानतळांवरून मुंबईकडे जाणार्‍या सर्व देशी हवाई प्रवाशांना मुंबईत उतरल्यावर आरटी-पीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक केलेला नाही.

यापूर्वी नकारात्मक अहवाल अनिवार्य होता…

मे महिन्याच्या सुरुवातीला सीएसएमआयएने (CSMIA-Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) अधिकृत निवेदन जारी केले होते जेणेकरुन शहरात येणाऱ्या सर्व स्थानिक प्रवाशांना विमानात बसण्याच्या वेळी नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी अहवाल सादर करणे बंधनकारक केले होते आणि आरटी-पीसीआर चाचणी अहवाल (RT-PCR test reports) नसलेल्या प्रवाशांना विमानामध्ये चढण्याची परवानगी नव्हती, असे आदेशात नमूद केले होते.

महानगरपालिकेने गो एअर (Go Air), इंडिगो (indigo ), विस्तारा (Vistara), स्पाइसजेट (Spicejet) इत्यादी विमान कंपन्यांच्या विमानतळ व्यवस्थापक आणि सीईओंना पत्र लिहून विमानांच्या तिकिटावरील अनिवार्य नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी संदर्भातील शासकीय निर्देशांचा उल्लेख करण्याचे निर्देश दिल्यानंतर हे नियम लागू करण्यात आले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief minister Uddhav Thackeray) यांनी रविवारी सांगितले की कोरोनाची घटती संख्या आणि रिकव्हरी दर 92 टक्के असूनही राज्यात कोव्हिड रूग्णांची संख्या जास्त आहे. तसेच राज्यातील बर्‍याच भागांत, विशेषत: ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे त्यामुळे या ठिकाणी निर्बंध आणखी कठोर केले जातील, तर मुंबईसह ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा खाली आले आहे अशा थोड्या प्रमाणात सुट देण्यात आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments