आपलं शहर

Mumbai : धारावीमध्ये तब्बल चार महिन्यानंतर समोर आले कोरोनाचे पहिले प्रकरण…

चार महिन्यांत पहील्यांदाच आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.

Mumbai : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईच्या धारावीमध्ये तब्बल चार महिन्यांत पहिल्यांदाच कोरोनाव्हायरसचा फक्त एक नवीन रुग्ण समोर आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्याने सांगितले की, धारावी झोपडपट्टी भागात बुधवारपर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. व त्यानंतर फक्त एक रुग्ण आढळला आहे.(Mumbai Dharavi)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्याने सांगितले की धारावीतील एकूण रुग्णांची संख्या 6829 वर पोचली असून त्यापैकी 6451 रूग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत तर 19 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. धारावी झोपडपट्टी एप्रिलच्या सुरुवातीला कोरोना विषाणूचा एक आकर्षण केंद्र बनली होती आणि 8 एप्रिल रोजी 99 नवी प्रकरणे याच झोपडपट्टीतून नोंदवली गेली होती.

जवळजवळ अडीच लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात ही धारावी झोपडपट्टी पसरललेली आहे.धारावी झोपडपट्टीत साडेसहा लाखाहून अधिक लोकसंख्या याठिकाणी आहे. आशिया खंडातील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments