खूप काही

Mumbai crime: तस्लिम बनून उकळले 20 लाख रुपये, महिलेचा प्रवास ऐकून थक्क व्हाल

एका महिलेने मुंबईची तस्लीम असल्याचे सांगून बँकेची फसवणूक केली आहे

Mumbai crime: प्रयागराजच्या सिव्हील लाईन्समधील अ‍ॅक्सिस बँकला 20 लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये सहा जणांचा समावेश असल्याचंही उघड झालं आहे. या महिलेने मुंबईची तस्लीम असल्याचे सांगून बँकेची फसवणूक केली आहे. खोट्या मतदार ओळखपत्राचा वापर करून या महिलेने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

तस्लिमने उघडले खाते…

सन 2019 मध्ये तस्लिम अख्तर नावाच्या महिलेने अ‍ॅक्सिस बँकेत खाते उघडले. मुंबईची रहिवासी असल्याचे दाखवून दिले होते. परंतु तिचे मूळ निवासस्थान बमरौली येथे असल्याचेही तपासात समोर आले आहे. तस्लिम अख्तर नावाच्या महिलेचे मतदार ओळखपत्र कसे मिळावले, याचा तपास आता सुरु आहे. मतदान ओळखपत्राचे स्कॅन करून, फोटो बदलल्यानंतर बनावट मतदार ओळखपत्र तयार केले. ते बँकेत ठेवले आणि त्यानंतर 20 लाख पाच हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले. ही रक्कम सिव्हिल लाईन्समधील जमीन विकणाऱ्याच्या नावावर ठेवण्यात आली होती. (Became a Taslim and took Rs 20 lakh, you will be amazed to hear the journey of a woman)

पोलिसांचे म्हणणे आहे की तपासात जमीन मालक तस्लीम मुंबईतील असल्याचे समोर आले. सिव्हिल लाइन्समधील जमीन कोणालाही विकली नाही आणि या संपूर्ण भागातील बँकेच्या काही कर्मचार्‍यांच्या भूमिकेबाबतही चौकशी केली जात आहे. या महिलेचा शोध घेणाऱ्यास बँकेने बक्षीस देखील जाहीर केले आहे. त्याअंतर्गत या फसव्या महिलेचे पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Account opened by Taslim)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments