आपलं शहर

Mumbai corona cases today: मुंबईमध्ये मागील 24 तासांत 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू…

मुंबईमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 7,15,879 आहे, तर कोरोनावर मात देऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 6,82,678 आहे.

Mumbai corona cases today:
मागील महिन्यात मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होती. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन, संचारबंदी यांसारखे अनेक निर्णय घेतले होते, त्यामुळे हळू हळू कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली.

कोरोनाने 18 लोकांचा मृत्यू
महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मागील चोवीस तासांमध्ये कोरोनाचे 733 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील 18 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर 723 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.(Corona killed 18 people)

मुंबईमध्ये कोरोनाचे 15,798 ॲक्टिव केसेस
मुंबईमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 7,15,879 पोहचली आहे, तर कोरोनावर मात देऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 6,82,678 झाली आहे. मुंबईमध्ये सध्या 15,798 ॲक्टिव केसेस आहेत, या सर्व रुग्णांवर सध्या उपचार चालू आहे. मुंबईतील कोरोनामुळे एकूण मृतांचा आकडा 15,164 आहे.(15,798 active cases of corona in Mumbai)

महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या
महाराष्ट्रात मागील 24 तासात नवीन 10 हजार 697 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर 24 तासात 307 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 58 लाख 98 हजार 550 आहे, तर कोरोना संक्रमणामुळे एकूण मृतांचा आकडा 106727 आहे. त्याचबरोबर सरकारने मृतांच्या आकड्याची पडताळणी केल्यावर 2,213 मृतांचा आकडा वाढला.(Total number of corona patients in Maharashtra)

महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमित रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढत असला, तरी कोरोना रिकव्हरी रेट देखील वाढत आहे. मागील 24 तासात महाराष्ट्रात 14,910 कोरोना रुग्ण ठीक होऊ घरी पाठवण्यात आले आहेत.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments