खूप काही

Mumbai corona update :चांगली बातमी, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घसरली,रुग्णवाढीचा दर 0.01 टक्क्यांवर पोहोचला…

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट (positivity rate) 0.01 टक्क्यांवर आला आहे.

Mumbai corona update:राज्यात कोरोनाची (corona) सर्वाधिक प्रभाव पडलेल्या शहरांपैकी एक म्हणजे मुंबई (mumbai) . पण गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट नोंदवली जात आहे.

मुंबईत हळूहळू परिस्थिती सुधारत असून कोरोनाच्या रुग्णांचा दुप्पटीचा कालावधी (doubling rate) 653 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे.तर मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट (positivity rate) 0.01 टक्क्यांवर आलाय तर दिवसाला 700 च्या आसपास कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. (the number of corona patients in Mumbai has dropped, the growth rate has reached 0.01 percent)

मुंबईत शनिवारी जवळपास 30 हजारांहून अधिक लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यातून रविवारी मुंबईत 700 नव्या रुग्णांची नोंद झाली तर कोरोनामुळे 19 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत सध्या रुग्णवाढीचा दर 0.01 टक्के आहे कोरोना रुग्णांचा दर 2.32 टक्के आहे.

रविवारी समोर आलेल्या आकडेवारीनंतर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 लाख 65 हजारावर पोहोचली आहे तर आत्तापर्यंत कोरोनातून 6 लाख 85 हजार म्हणजेच 95 टक्के लोक बरे झाले आहेत.

राज्यातदेखील परिस्थिती सुधारत आहे…

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची परिस्थिती सुधारत असल्याचे दिसून येत आहे तर गेल्या 24 तासांमध्ये राज्यात केवळ 10,442 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे तर दुसरीकडे 7504 अधिक लोक बरे होऊन घरी परतले आहेत त्यामुळे राज्यातील कोरोनाची रिकव्हरी रेट (Recovery rate) 95.44 टक्क्यांवर पोहोचला आहे. (The situation is improving in the state too …)

अजित पवार आणि राजेश टोपे करणार कोल्हापूरचा दौरा…

मुंबई आणि पुणे नंतर कोरोनाने कोल्हापूरला वेढलेले आहे. कोल्हापुरात (Kolhapur) कोरोनाचे वाढते प्रमाण अजून आटोक्यात आलेले नाही. गेल्या 24 तासात कोल्हापुरात 1586 नव्या रुग्णांची नोंद झाले आहे तर कोरोनामुळे 30 जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) सोमवारी कोल्हापूरचा दौऱ्यावर जाणार आहेत यावेळी प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. (Ajit Pawar and Rajesh Tope will tour Kolhapur …)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments