आपलं शहर

Mumbai Corona update : कोरोना कमी झाला म्हणून समाधानी मानू नका, उच्च न्यायालयाने फटकारले…

अतिरिक्त वकील अनिल सिंह यांच्या मते रेमडेसिव्हीर उपलब्ध नाहीतर दुसरीकडे टॉसिलीझुमॅबची कमतरता आहे.

Mumbai Corona update : कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे राज्य सरकार ‘आत्मसंतुष्ट’ होत आहे का, असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay high court) गुरुवारी उपचारांसाठी आवश्यक असणारी, टॉसिलीझुमॅब (Tocilizumab) इंजेक्शन घेण्याबाबत कोणती पावले उचलली गेली आहेत याची माहिती सरकारकडे मागितली. (Don’t be satisfied as Corona was reduced, the High Court slammed)

तर कोव्हिड-19 (corona virus update) व्यवस्थापनावरील जनहित याचिका ऐकणार्‍या मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता (Deepankar darta) आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni) यांनी कोरोनाची संख्या कमी होत आहे, त्यामुळे सरकारचा रस कमी होत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

अतिरिक्त वकील अनिल सिंह यांच्या मते रेमडेसिव्हीर उपलब्ध नाहीतर दुसरीकडे टॉसिलीझुमॅबची कमतरता आहे. तर टॉसिलीझुमॅबची कमतरता कायम असून कोव्हिडची औषधे मिळविण्यासाठी लोक झटत आहेत, असे अॅड. राजेश इनामदार म्हणाले. त्यामुळे राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 4 जून रोजी मुंबई शहर जिल्हाधिकार्यांना एका रुग्णाला टॉसिलीझुमॅब देण्यासाठी पत्र पाठवले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments