खूप काही

Mumbai Crime : रुग्णालयात डॉक्टरानेच काढली महिला डॉक्टरची छेड

मालाड येथील हाॅस्पिटलमधल्या एका डॉक्टरवर महिला डॉक्टरने छेडछाड आणि शारिरीक शोषण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Crime : मुंबईच्या मालाड पोलिसांनी रविवारी एका डॉक्टरविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या डॉक्टरवर महिला डॉक्टरची छेडछाड आणि शारिरीक शोषण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित महिला मालाड वेस्टमधील लिंक रोडवर असलेल्या रुग्णालयात काम करत होते. ती महिला तिच्या हॉस्पिटलच्या केबिनमध्ये काही काम करत होती. त्यानंतर आरोपी डॉक्टर तिथे आला. त्या महिलेला एकटे पाहून त्याने तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्याचाही प्रयत्न केल्याची फिरयाद महिला डॉक्टराने नोंदवली आहे. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडल्याचंही पोलिसांनी सांगितले आहे.(Mumbai Crime: A female doctor was teased by a doctor at the hospital)

भयानक घाबरलेल्या महिलेने स्वतःला कसेबसे सावरत केबीनच्या बाहेर पळ काढला. त्यावेळी महिलेला काय करावं, हेच सुचत नव्हतं. त्यामुळे आपल्या काही सहकाऱ्यांना महिलेने ही घटना सांगितली.

एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने महिलेने मालाड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली आहे. “महिला डॉक्टरांच्या तक्रारीवरून कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी डॉक्टर फरार असल्याचं सांगण्यात येतय, त्यामुळे अनेक ठिकाणी छापे टाकून त्याला पकडण्याचा शोध सुरु असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments