आपलं शहर

Mumbai Crime : शेजारी करायचे तक्रार म्हणून स्वत:च केली आत्महत्या

Mumbai Crime : मुंबईमध्ये 12 व्या मजल्यावरून महिलेची स्वतःच्या मुलासह उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सुसाईट नोटमध्ये शेजाऱ्यांना दोष दिला आहे.

Mumbai Crime : मुंबईमध्ये 12 व्या मजल्यावरून महिलेची स्वतःच्या मुलासह उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सुसाईट नोटमध्ये शेजाऱ्यांना दोष दिला आहे.

44 वर्षीय रेश्मा ट्रेंचिलने शेजारी आपल्या मुलावर ओरडत असतात आणि एकसारखी सोसायटीकडे तक्रार करत असल्याचा आरोप केला. त्यासंबंधीत सुसाईट नोट समोर आली आहे.

सोमवारी मुंबईतील एका महिलेने 12 व्या मजल्यावरून आपल्या लहान मुलासह उडी मारली. त्यात 44 वर्षीय रेश्मा ट्रेंचिल आणि तिच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून खालच्या मजल्यावरील शेजाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

सुश्री ट्रेंचिल यांच्या पतीचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. आणि चंदीवाली येथील अपार्टमेंटमध्ये त्यांच्या फ्लॅटमध्ये त्या आपल्या सात वर्षाच्या मुलासह एकट्याच राहत होत्या. 2021 च्या एप्रिलमध्ये त्या इमारतीमध्ये राहण्यासाठी गेल्याची माहिती समोर येत आहे, त्यातच त्यांच्या शेजार्‍यांना आपली अडचण होत असून प्रत्येकवेळी आपल्या मुलावरही ते शेजारी आरडाओरड करत असल्याची माहिती सुसाईड नोटमधून समोर आली आहे,

शेजारी 67 वर्षीय अय्यूब खान आणि त्यांच्या 60 वर्षीय पत्नीसह मुलगा शादाब यांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. . मे महिन्यात संबंधित महिलेच्या पतीचे निधन झाले होते, तेव्हापासून संबंधित महिलाही नर्वस असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कृषी वस्तूंच्या ऑनलाइन व्यापार क्षेत्रात ते मुख्य व्यवसाय अधिकारी असल्याची माहितीही शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे.

आपल्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर तो त्यांची काळजी घेण्यासाठी उत्तर प्रदेशातील वाराणसीला गेला होता. तिथे त्यांनाही कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्यांचे निधन झाल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments