आपलं शहर

Mumbai Crime : चोरट्यांनी लांबवलेला फोन वाचवण्याच्या नादात महिलेचा मृत्यू

Mumbai Crime : रिक्षा महामार्गावर धावत असताना दुचाकीवरील दोघांनी रिक्षाच्या मागे बसलेल्या महिलेचा फोन चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आपला फोन वाचवण्याच्या नादात महिलेचा रिक्षामधून तोल गेला आणि त्यात तिचा मृत्यू झाला.

Mumbai Crime : मुंबईजवळ ठाण्यातील ऑटोरिक्षामधून खाली पडल्यामुळे एका 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. चोरट्या दुचाकीस्वारांकडून आपला मोबाईल वाचवण्याच्या प्रयत्न करत असताना संबंधित महिला रिक्षातून खाली पडली. गुरुवारी पोलिसांनी ही माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. संबंधित महिला एका मॉलमधील स्पा सेंटरमध्ये काम करत होती. रात्री आठच्या सुमारास ती एका मित्रासह ऑटोरिक्षातून परत जात होती. त्यावेळेस ही घटना घडली.

ऑटोरिक्षा महामार्गावर असताना दुचाकीवरील दोन दरोडेखोर त्यांच्या वाहनाजवळ आले आणि फोन हिसकावून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपला फोन वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यादरम्यान तीचा तोल गेला आणि ती खाली पडली. यामुळे तिच्या डोक्याला बरीच दुखापत झाली आहे. त्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला.

महिलेबरोबर प्रवास करत असलेल्या मित्राच्या तक्रारीवरून पोलिसांनी फिर्याद नोंदवून आरोपीला अटक केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments