खूप काही

Mumbai fire news: मालाडमध्ये प्लास्टिकच्या गोदामाला अचानक लागली आग,लाखोंचे सामान जळून खाक

मालाड येथे रविवारी रात्री फायबर आणि प्लास्टिकचा गोदामाला अचानक आग लागली.

Mumbai fire news: मुंबईतील मालाड परिसरात रविवारी रात्री फायबर आणि प्लास्टिकचा गोदामाला अचानक आग लागली (mumbai fire news). त्वरित घटनास्थळी पोहोचून मुंबई अग्निशमन दलाने नियंत्रित केले. अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही परंतु बरेच आर्थिक नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.(Plastic warehouse catches fire in Malad, millions of goods burnt)

मालाड (Malad) येथील चिकू रोड परिसरातील मालवणी चर्च जवळ एका प्लास्टिक व फायबर (fibers and plastic) असलेल्या गोदामाला रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास अचानक आग लागली. त्वरीत ही आग विझविण्यायासाठी सदर घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे ४-फायर वाहन, ४ वॉटर टँकर दाखल झाले आणि अग्निशमन दलाच्या (fire brigade) कर्मचार्‍यांनी या भीषण आगीवर नियंत्रण मिळवले.

अचानक लागलेल्या आगीत कोणालाही दुखापत किंवा जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.मात्र ह्या आगी मध्ये एकुण 4 कारखान्यांतील फायबर आणि प्लास्टिकच्या मूर्त्या, डाय, स्टँड अशा अनेक वस्तू जळून मोठ्या प्रमाणात वर आर्थिक नुकसान झाले आहे सदर घटनेमागील कारण काय आहे यावर चौकशी सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments