खूप काही

Mumbai Indians: मुंबई इंडियन्स एवढी सक्सेसफूल टीम का, वाचा काय आहे कारण

यूट्यूबच्या संवादात किरण मोरेने आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या अभूतपूर्व यशामागील कारण उघडकीस आणले.

Mumbai Indians :मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. त्याने पाच वेळा इंडियन प्रीमियर लीग (Indian premier league) जिंकली आहे. तर रोहित शर्माच्या (Rohit Sharna) नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सलग दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

मुंबई इंडियन्सचा टॅलेंट स्काऊट आणि विकेटकीपिंग सल्लागार किरण मोरे (kiran more) याने कर्टली अँड करिश्मा शोवरील (Curtly and Karishma show) यूट्यूबच्या संवादात आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या अभूतपूर्व यशामागील कारण उघडकीस आणले. (Why Mumbai Indians are such a successful team, read what is the reason.)

किरण मोरे यूट्यूब चॅनलवर स्पष्टपणे म्हणाला की, मुंबई इंडियन्सशी संबंधित असल्याचा त्याला फार आनंद झाला आहे.फ्रँचायझी फक्त दोन महिनेच काम करत नाही तर मुंबई इंडियन्सच्या संघाचे आणि फ्रँचायझीचे वर्षभर कठोर परिश्रम सुरू असतात..

मुंबई इंडियन्सचे कौतुक करत किरण म्हणाला, ‘मुंबई इंडियन्स संघाने जे यश मिळवले ते अभूतपूर्व आहे. या यशामागे संघाचे मालक, संघातील सर्व खेळाडू ,इतर कार्यकारी वर्ग यांची भरपूर मेहनत असते.मुंबईततील एक सुंदर मैदान, चांगले खेळपट्टे, दिवे, ड्रेसिंग रूम, फिजिओ, प्रशिक्षक आणि सर्व प्रकारच्या सुविधादेखील जागतिक दर्जाच्या आहेत. याव्यतिरिक्त असे नाही की संघ फक्त दोन महिने काम करतो, तर उत्कृष्ट विजय मिळवण्यासाठी संपूर्ण वर्षभर मेहनत करावी लागते. आणि आता इतर सर्व फ्रँचायझीदेखील हे समजण्यास सुरुवात करत आहेत. त्यांनीही आता मुंबई इंडियन्सची कॉपी करण्यास सुरुवात केली आहे.

किरणने मुंबई इंडियन्स टीमच्या मालकांचे विशेषत: आकाश अंबानी (Aakash Ambani) यांचे अधिक मनापासून कौतुक केले. तो म्हणाले, ‘या यशाचे मी बरेचसे श्रेय मुंबई इंडियन्सच्या टीम मालकांना देऊ इच्छितो. संघाचा युवा मालक आकाश अंबानी संघाचया सर्व कामकाजात खूप रस घेतो. खेळाची सर्व माहिती त्याला चोखपणे लक्षात असते.त्यामुळे संघात नेहमी संतुलन कायम असते.

मुंबई इंडियन्सने 2020मध्ये युएई (UAE) येथे पार पडलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटलला (Delhi capital) पाच विकेट्सने हरवले होते.या वर्षी कोरोनामुळे आयपीएल सामना रद्द झाला तेव्हा मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर होती व टीमने 4 सामने जिंकले आणि 3 सामान्यांत संघाची हार झाली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments