आपलं शहर

Mumbai Local : कोरोना संपेपर्यंत मुंबई लोकल बंदच! विजय वडेट्टीवार…

मुंबई पहिल्या टप्प्यात असली, तरीही निर्बंध हे तिसऱ्या टप्प्याचे ठेवण्यात येणार.

Mumbai Local : मुंबईत सर्वसामान्यची लाईफ लाईन म्हणजे लोकल ट्रेन,(Local Train)कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना विषाणूमुळे लोकल ट्रेनचा प्रवास (Migration) सर्वसामान्यसाठी बंद करण्यात आला आहे. कोरोना(Corona) काळात गर्दी होऊ नये म्हणून बंद झालेली लोकल, आता पुढील काही दिवसात सुरू होईल का याची कोणतीही चिन्ह राज्यकर्ते आणि प्रशासन यांच्या बोलण्यावरून दिसत नाहीत.(Mumbai Local)

2020 मध्ये भारतात(India) आलेली कोरोनाची ही माहामारी अजूनही सुरूच आहे,कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली आहे, पण आता सगळीकडे तिसऱ्या लाटेची(3 Wave) भीती जास्त प्रमाणात व्यक्त केली जात आहे. म्हणूनच मुंबई महापालिका योग्य ती पावले उचलत आहेत , मुंबईतील सध्याची कोरोना परिस्थिती पाहिली तर राज्य सरकारने तयार केलेल्या टप्प्यात मुंबई पहिल्या टप्प्यात आहे, परंतु निर्बंध हे तिसऱ्या टप्प्याचे ठेवण्यात आले आहेत.

1) मुंबईत आजपासून 27 जूनपर्यंत लेव्हल 3 चे निर्बंध कायम राहतील.

2)मुंबईत पॉझिटीव्हिटी रेट 3.79% आणि ऑक्सिजन बेड 30.56% आहेत.

3) मुंबई पहिल्या टप्प्यात आहे, परंतु निर्बंध हे तिसऱ्या टप्प्याचे ठेवण्यात येणार आहेत.

4)टास्क फोर्सने व्यक्त केले तिस-या लाटेची शक्यता.

मुंबईकरांचा लोकलचा प्रवास(Local Travel) अजून लाबंताना दिसत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांच्यानंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Vadettivar) यांनीही मुंबईची लोकल इतक्यात सुरू होणार नसल्याचं सांगितले आहे. त्यामुळे मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. मुंबईची लोकल कधी सुरू होणार ?असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांना करण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments