खूप काही

Mumbai local train:सेंट्रल लाईनवर आज मेगा ब्लॉक,पहा विशेष गाड्यांचे वेळापत्रक…

13 जून रोजी मुंबई विभागातील उपनगरी भागांवर मेगाब्लॉक (megablock) घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे मंडळाने शुक्रवारी सांगितले.

Mumbai Local train:रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध अभियांत्रिकी व देखभालीसाठीची (suburban sections in Mumbai) कामे करण्यासाठी 13 जून रोजी मुंबई विभागातील उपनगरी भागांवर मेगाब्लॉक (megablock) घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे मंडळाने शुक्रवारी सांगितले. (Mega block on Central line today, see special train schedule …)

सकाळी 10.30 ते दुपारी 03.46 दरम्यान मुलुंडहून (Mulund) सुटणारी जलद लोकल (fast train from Mulund) वेळापत्रकातील वेळेच्या दहा मिनिटे उशिरा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, दिवा आणि डोंबिवली (dombivali) या स्थानकांवर थांबेल.

तर सकाळी 10.37 ते दुपारी 3.51 या वेळेत कल्याण (Kalyan) येथून सुटणार्‍या स्लो लोकल (Slow local train) कल्याण व मुलुंड स्थानकांदरम्यान डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकात अप स्लो (up slow) मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील. वेळापत्रकात 10 मिनिटे उशीर होईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT-Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) येथून सकाळी 0.49 ते दुपारी 4.01 पर्यंत पनवेल / बेलापूरहून सुटणारी व डाऊन हार्बर मार्गावरील (Harbour line) लोकल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.03 ते दुपारी 3.16 दरम्यान सुटतील पण त्या रद्द राहतील.

सकाळी 9.01 ते सायंकाळी 3.53 या वेळेत पनवेलहून सुटणार्‍या ठाण्याकरिता अप-हार्बर मार्गावरील (Up Trans-harbour line) लोकल सेवा आणि सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 दरम्यान पनवेलला जाणारी ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील.

सकाळी 10.45 ते दुपारी 4.00 या वेळेत खारकोपर (Kharkopar) येथून नेरळ / बेलापूरसाठी सुटणारी अप बीएसयू (Up BSU) मार्गावरील आणि बीएसयू मार्गावरील नेरळ / बेलापूर येथून सकाळी 10.15 ते दुपारी 3.32 दरम्यान सुटणारी डाऊन बीएसयू मार्गावरील लोकल सेवा रद्द राहील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी (Vashi) विभागातही मेगा ब्लॉकदरम्यान विशेष गाड्या (special trains) चालवल्या जातील.तसेच मेगा ब्लॉक दरम्यान ठाणे-वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर लाइन सेवा उपलब्ध असेल.

पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. त्यामुळे प्रवाशांना ही गैरसोय सहन करावी अशी रेल्वे प्रशासनालाने विनंती केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments