आपलं शहर

Mumbai Local Update : महिलांसाठीही लोकल प्रवास नाहीच, वाचा प्रमुख कारण

अनलॉकनुसार महिला लोकल ट्रेनमधून प्रवास करू शकणार नाहीत.

Mumbai Local Update : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी होत असल्याने आता अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये देखील या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. याबाबत बीएमसीने शनिवारी नवीन गाईडलाईन देखील जारी केली आहे.

बीएमसीचा महत्वाचा निर्णय
बीएमसीने जारी केलेल्या गाईडलाईननुसार एक निर्णय घेण्यात आला आहे. यात असे सांगितले गेले आहे की, अनलॉकनुसार महिला लोकल ट्रेनमधून प्रवास करू शकणार नाहीत. नवीन गाईडलाईन येईपर्यंत ही बंदी महिलांवर कायम राहणार आहे.(A controversial decision has been taken as per the guideline issued by BMC)

महिलांसाठी लोकल प्रवासावर बंदी
त्याचबरोबर अशी देखील माहिती मिळाली आहे की, गाईडलाईन 3 द्वारे महिलांना ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. परंतु याबाबत सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्यामुळे महानगरपालिकेने सर्वसाधारण महिलांच्या प्रवासावर बंदीचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर हे गाईडलाईन 7 जूनपासून लागू करण्यात येतील.(Ban on local train travel for women)

आत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी लोकलसेवा सुरू
गाईडलाईननुसार फक्त वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील लोकांना ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य जनतेला अध्याप ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली गेली नाही. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांना देखील आपल्या भागांमध्ये लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याबाबत काही नियम बनवायचे असतील तर त्यासाठी बीएमसीशी चर्चा करावी लागेल.(Launching local services for people in emergency services)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments