Mumbai Local update : काय आहे मुंबई लोकलची संपूर्ण परिस्थिती? वाचा एका क्लिकवर
सध्या मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेकठिकाणी पाणी साचलं आहे. याच पावसाचा फटका मुंबई लोकलवर पडला आहे.

सध्या मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेकठिकाणी पाणी साचलं आहे. याच पावसाचा फटका मुंबई लोकलवर पडला आहे.
मुसळधार पावसामुळे चुनाबट्टीसह मुंबईतील अनेक लोकल स्टेशनवर पाणी साचलं आहे. अनेक स्थानकांना तळ्याचं स्वरुप आलं आहे. सायन-कुर्ला दरम्यान साचलेल्या पाण्यामुळे रेल्वे प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सीएसएमटी-ठाणे मुख्य मार्गावरील सेवा सकाळी 10.20 पासून थांबवण्यात आली आहे. सीएसएमटी-मानखुर्द हार्बर लाइनवरील सेवा सकाळी 11:10 वाजल्यापासून रद्द करण्यात आली होती.
सध्या ट्रान्स हार्बर आणि बीएसयू सेवा सुरळीत चालू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच ठाणे ते कर्जत / कसारा आणि मानखुर्द-पनवेल यादरम्यान थांबवलेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांचेदेखील शेड्यूल बदलण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघणाऱ्या रेल्वेंचे शेड्यूल बदलल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कळवलं आहे.