आपलं शहर

Mumbai Locals Service :लोकलमधील गर्दीमुळे महाराष्ट्र सरकारचा नवा पर्याय..

निर्णयामुळे लोकलची प्रवास वाहतूक करण्याची क्षमता 25 टक्क्यांनी वाढणार आहे.

 Mumbai Locals Service :पश्चिम रेल्वे ने अंधेरी ते विरार स्थानकादरम्यान स्लो ट्रॅकवर 15 डब्यांची विशेष गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन जरी असला आणि सामान्य नागरिकांना लोकलमध्ये परवानगी जरी नसली तरी ट्रेन अनेक अत्यावश्यक सुविधेतील नागरिकांमुळे गर्दी होत आहे, त्याच गर्दीला कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेतला आहे(.mumbai locals service new option for maharashtra government due to congestion in locals)

रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर (sumit thakur ) म्हणाले यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. सोमवारपासून (28 जून) मुंबईत 25 नव्या लोकल ट्रेनचा समावेश झाला आहे. वेस्टर्न रेल्वे मार्गावर चर्चगेट आणि डहाणू स्थानकादरम्यान एकूण 1367 लोकल ट्रेन सेवा सुरु आहेत. पश्चिम रेल्वेने (western railway) 13 धिमी आणि 12 फास्ट लोकल वाढवल्या आहेत.

“12 डब्यांच्या जागी 15 डब्यांची सेवा सुरु केल्याने प्रवाशांना याचा फायदा होणार आहे, यामुळे रेल्वे वाहतुकीची क्षमता 25 टक्क्यांनी वाढेल रेल्वेने अंधेरी ते विरार दरम्यान 14 रेल्वे स्टेशनवर 27 प्लॅटफॉर्मचा विस्तार केला आहे. तर मुंबईतील लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी स्लो पटरीवरही 15 डब्यांची लोकलसेवा सुरु केली आहे.( western railway authorities introduce 15 car services on slow line between andheri to virar, as  it will increase the  carrying capacity of these service by 25 %) .

तसे पायाहला गेलं, तर मुंबईमधील अनेक स्टेशन्सवर मोठी गर्दी होत असते. त्यात अंधेरी स्थानकाचाही समावेश होतो, परंतु आता हीच गर्दी कमी करण्यासाठी आणी प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी वेस्टर्न रेल्वेने नवीन सेवा सुरु केली आहे. अंधेरी ते विरार दरम्यान धावणाऱ्या स्लो लोकलमध्ये आता 15 डब्ब्यांच्या लोकलमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे रोजच्या होणाऱ्या गर्दीला थोड्याफार प्रमाणात टाळता येणार आहे.

अंधेरी ते विरार दरम्यान 14 स्टेशन्स आहेत. आणि त्या सगळ्या स्टेशन्सवरील इन्फ्रास्टक्चरचे काम सुरु आहे. तसेच 60 करोड रुपयांचा निधी यासाठी सरकारकडून मंजूर झाला होता.

या निर्णयामुळे लोकलची प्रवास वाहतूक करण्याची क्षमता 25 टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे प्रावशांचा प्रवास अधिक जास्त सुखकर होणार आहे. येणाऱ्या काळात अजून काही सेवादेखील या अंधेरी ते विरार दरम्यान मंजूर केल्या जाती, अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे थोड्या फार प्रमानात का होईना प्रवाशांना मोकळा श्वास घेता येणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments