आपलं शहर

Mumbai Lockdown Update : मुंबईत लॉकडाऊनचे नियम शिथील, वाचा पालिकेची नियमावली

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 दिवस वाढवण्यात आला आहे .

Mumbai Lockdown Update:

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईतील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथीलता आणली आहे. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, राज्यातील कोरोना विषाणूची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 दिवस वाढवण्यात आला आहे. मात्र सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 च्या दरम्यान अनावश्यक दुकाने उघडण्यास परवानगी आहे, तसेच रस्त्याच्या दोन्हीही बाजूची दुकाने सुरू ठेवण्याचे वेळापत्रक तयार केले आहे.

BMCच्या नवीन सूचना

1 जूनपासून सकाळी 7 ते 15 जून सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंध कायम असणार आहे. दरम्यान ऑनलाइन पद्धतीने आवश्यक आणि अनावश्यक वस्तूंच्या वितरणास परवानगी देण्यात आली आहे. दुपारी दोन वाजल्यानंतर फक्त आवश्यक वैद्यकीय आणि आपत्कालीन तसेच अन्न वितरणास परवानगी असेल. सरकारी कार्यालयांना 25% क्षमतेवर काम करण्याची परवाणगी देण्यात आली आहे.

शेती संबंधित दुकानेदेखील आठवड्यांच्या संपूर्ण दिवस आणि दिवसातातून दुपारी दोन वाजेपर्यंत खुली असतील. इव्हन आणि ऑडच्या सिस्टिमनुसार अनेक दुकाने सुरु करण्याची परवाणगी पालिकेकडून देण्यात आली आहे.

पुण्यातही दुकानांना दिली परवानगी

पुणे महानगरपालिकेने अनावश्यक वस्तुंचा व्यवहार करणारी दुकाने मंगळवारपासून सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी दिली, तसेच महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर पुणे कोरोना परिस्थिती घट झाली आहे, नियमांचे पालन करून दारू दुकाने ही चालू ठेवण्यास परवानगी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments