Mumbai Metro : मुंबई मेट्रोच्या 52 किमी भुयारी मार्गाचं काम पूर्ण, पाहा कसं आहे सगळं स्ट्रक्चर…
मुंबईत मेट्रो मार्गाचे बांधकाम जमिनीवरून आणि जमनीच्या खालून अत्यंत वेगाने सुरू आहे

मुंबईत मेट्रो मार्गाचे बांधकाम जमिनीवरून आणि जमनीच्या खालून अत्यंत वेगाने सुरू आहे. मंगळवारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMRCL) कफ परेड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यानच्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण केले. मेट्रो -3 मधील कॉरिडॉरचे पॅकेज -1 चे काम पूर्ण झाल्याने या मार्गाचा 38 वा बोगदा पूर्ण झाला आहे.
कुलाबा-वांद्रे-एसआयपीझेड दरम्यानचे एकूण 52 किमी..लांबीचा कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. यात 35 कि.मी. भुयारी रस्ता पूर्ण झाला आहे. एमएमआरसीएलच्या मते, संपूर्ण मार्गात बोगद्याचे काम फक्त 4 टक्के आहे.
दक्षिण मुंबई परिसरातील अनेक जुन्या इमारतींमध्ये एमएमआरसीएलने 149 दिवसात हुतात्मा चौक ते सीएसएमटी अप-डाऊन मार्ग तयार केला आहे. 557 मीटर लांबीच्या मार्गाच्या बांधकामात काँक्रिटच्या 405 रिंग वापरल्या गेल्या आहेत. रॉबबिन्स कन्स्ट्रक्शनच्या सन-1 ड्युअल मोड हार्ड स्टॉप टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने भुयारी रस्ता तयार केला गेला.
सोमवारी मेट्रो -7 आणि मेट्रो -2 ए कॉरिडोरच्या 20 किमी मार्गाची चाचणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनेक नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. 2021 च्या ऑक्टोबरपर्यंत 20 किमी आणि जानेवारी 2022 पर्यंत संपूर्ण 34 किमी मार्गावर मेट्रो सेवा सुरू होईल.
बोगदयाचे काम आव्हानात्मक होते
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रशासकीय संचालक रणजितसिंग देओल यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण मार्गावर भूमिगत उतारे करण्याचे 96 टक्के काम पूर्ण झाले आहे. मेट्रो -3 च्या एकूण 7 पॅकेजेपैकी 6 पॅकेजेचे बोगदा बांधकाम 100 टक्के पूर्ण झाले आहे. जुन्या इमारतीजवळ बोगद्याचे बांधकाम करणे अत्यंत आव्हानात्मक होते. पॅकेज -1 अंतर्गत कफ परेड, विधान भवन, चर्चगेट आणि हुतात्मा चौक मेट्रो स्थानकांचे बांधकाम सुरू आहे.
पॅकेज – 1 अंतर्गत भुयारी रस्ते
– कफ परेड ते विधान भवन (अप लाइन 1228 मीटर, डाऊन लाइन 1254 मीटर)
– विधान भवन ते चर्चगेट अप लाईन 498 मीटर, डाऊन लाइन 481 मीटर)
– चर्चगेट ते हुतात्मा चौक (अप लाइन 654 मीटर)
– हुतात्मा चौक ते सीएसएमटी अप लाइन (अप लाइन 557 मीटर डाउन 559 लाइन मीटर)