आपलं शहर

Mumbai Model : मुंबई मॉडेल दिल्लीमध्ये राबवणार, दिल्लीश्वरांची ग्वाही

दिल्ली सरकारच्या प्रतिनिधींनी मुंबईला भेट देण्याचं नियोजन केले आहे.

Mumbai Model :कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई पालिकेने अनेक उपाय योजना केल्या आहेत. अनेक अडचणींशी सामना करत पालिकेने कोरोनोच्या दुसऱ्या लाटेवरही मात केली आहे. मुंबई पालिकाने कोरोनाविरोधात अनेक यंत्रणांचा वापर केलाय. वॉर्ड रूम, ऑक्सिजन पुरविण्यातील व्यवस्था, कमी काळात उभारलेली कोव्हिड केंद्रे अशा महत्त्वाच्या गोष्टी पालिकेने उभारल्या असल्याने सहाजिकच पालिकेचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सुचक वक्तव्य केले आहे.

कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या दिल्लीला आता मुंबई मॉडेलची आठवण झाली आहे. मुंबईची यंत्रणांचा वापर करण्यासाठी दिल्लीने पुढाकार घेतला आहे. यासाठी दिल्ली सरकारच्या प्रतिनिधींनी मुंबईला भेट देण्याचं नियोजन केले आहे.

गोरेगाव येथील नेस्को जम्बो कोव्हिड सेंटरला तसेच अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयास दिल्लीच्या पथकाने भेट देऊन तेथील व्यवस्था समजून घेतली आहे. तिथलं वर्ड रूमचे नियोजन, ऑक्सिजनचा पुरवठ्याचे नियोजन, रुग्णालयातील व्यवस्थापन, त्याचबरोबर रुग्णांची सोय आणि इतर कामांचा केंद्रीय पथकाने आढावा घेतला आहे.

हा दौरा मुंबईतील पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांच्या मार्गदर्शनाखाली केला गेला. कोरोनाच्या लढाईत अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी (Additional Municipal Commissioner Suresh Kakani) यांच्या अनुभवाचा फायदा दिल्लीतील प्रतिनिधींना मिळावा यासाठी बैठकही घेण्यात आली आहे. मुंबईतील रुग्णांसाठी यंत्रणा कशी राबवली जातेय, काम कसं चालतय, कोरोना रुग्णांनाची चाचणी करण्याचे नियोजन, रुग्णांची देखभाल, व्यवस्था, ऑक्सिजनचा पुरवठा, लसीकरण याविषयी माहितीचा आढावा घेण्यात आला. पथकामध्ये दिल्लीतील 2 आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी डॉ. संजय अगरवाल, डॉ. धर्मेद्रकुमार हे देखील उपस्थित होते.

दिल्लीतही मुंबईसारखे जम्बो केंद्र :

कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी पालिकेने अवघ्या कमी काळात जम्बो करोना केंद्र उभारली आहेत. गोरेगाव येथील जम्बो कोरोना केंद्रातील डायलिसिस, आयसीयू, ऑक्सिजन बेड कशाप्रकारे कार्यरत आहेत, हे जाणून गेले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments